मुंबई : खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएमला महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यामध्ये महाविकास आघाडातील शिवसेना आणि काँग्रेस या पक्षांनी एमआयएमच्या या भूमिकेला विरोध दर्शवला आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र त्यांचं स्वागत केलं आहे. पण थेट आघाडीत सहभागी होण्याची ऑफर न देता सल्ला दिला आहे. (NCP welcomes MIM role of going with MVA govt but gives important advice by Jayant Patil)
जयंत पाटील म्हणाले, एमआयएम समविचारी आहे का? याचा अभ्यास करावा लागेत. त्यांचा पुरोगामी विचारसरणीवर आणि भाजपच्या आत्ताच्या वर्तनावर विरोध असेल तर त्यांनी थेट दाखवला पाहिजे. सपाचा पराभव झाला तिथे ८६ मतदारसंघात सपाच्या उमेदवारांना २ हजारांपेक्ष कमी मतांनी पराभव झाला. काही ठिकाणी तर २०० ते ३०० मतांनी पण पराभव झाला. याच ठिकाणी एमआयएमच्या उमेदरवारांनी २ ते ५ हजार मतं मिळवली आहेत. यावरुन भाजपच्या विजयात एमआयएमचाच वाटा असल्याचं दिसून येतं. पण या सगळ्यामध्ये त्यांना रस नाही हे त्यांनी सिद्ध करावं. भाजपच्या पराभवात त्यांना रस असेल तर त्यांनी हे स्पष्ट करावं. देशभरात त्यांच्या पक्षाने ही भूमिका घेतली तर लोकांचा त्यांच्यावर विश्वास वाढेल. उलट भाजपविरोधात समविचारी पक्ष एकत्र येण ही चांगलीच बाब आहे.
चंद्रकांत पाटलांचे मनसुबे सिद्धीस जाणार नाहीत
शिवसेनेच्या खात्यांना कमी निधी दिला जात असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. यामुळंच त्यांच्यामते खदखद असल्याचाही त्यांनी दावा केला होता. पण हा दावा फेटाळताना जयंत पाटील म्हणाले, राज्यमंत्री शंभूराजे देसाई विधानपरिषदेत स्पष्टपणे सांगितलंय की शिवसेनेच्या खात्यांना व्यवस्थित निधी दिलेला आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शेवसेनेत संतुलन आहे, त्यामुळं चंद्रकांत पाटलांनी याची काळजी करायची गरज नाही. त्यामुळं चंद्रकांत पाटलांचे मनसुबे सिद्धीस जातील असं वाटत नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.