Sharad Pawar Nagaland esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar: राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादीने कर्नाटकमधील निवडणूकीबाबत घेतला मोठा निर्णय

कर्नाटकमध्ये काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार

अंकिता खाणे (Ankita Khane)

महाराष्ट्रात अनेक वर्षे सत्तेवर राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर राज्यांमध्येही हातपाय पसरण्याचा प्रयत्न करीत आहे. तसेच, ‘राष्ट्रवादी’ने यापूर्वीही कर्नाटकात विधानसभेसाठी काही मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. मात्र, ‘राष्ट्रवादी’ला एकाही जागेवर विजय मिळाला नव्हता, तरीही यावेळी कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा विचार राष्ट्रवादीने सुरू केला आहे. त्यामुळे कर्नाटकात राष्ट्रवादीला यश मिळणार का, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

दरम्यान राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कर्नाटकमधील विधानसभा निवडणूक लढवण्याचा आता निर्णय घेतला आहे. त्यानिमिताने महाराष्ट्राच्या जवळील राज्यांमध्ये उमेदवार उभे करून पुन्हा पक्षविस्तार केला जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जातील हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, मुंबईत होणाऱ्या पक्षाच्या बैठकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितले आहे.

तर कर्नाटकमध्ये आम्ही कोणत्याही पक्षाशी युती करणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे जागा लढवणार असला तरी मराठी भाषकांच्या हिताला महत्त्व दिलं जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीला मदत करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असं शरद पवार म्हणालेत.

कर्नाटकमध्ये २२४ मतदारसंघ असून काही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करेल. मात्र, सीमाभागांतील मराठी भाषकांसाठी आपसांतील मतभेद हितावह ठरणार नाहीत. त्यामुळे आम्ही महाराष्ट्र एकीकरण समितीला पाठिंबा देऊ, असेही पवार यांनी यावेळी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mohan Bhagwat : "हिंदूंशिवाय जगाचं अस्तित्व राहणार नाही, आपण स्वातंत्र्यासाठी दीर्घ काळ लढा दिला"; मोहन भागवतांचे ठाम मत!

Love Rashifal 2025: डिसेंबरमध्ये गुरू व चक्र ग्रहाचे भ्रमण! ‘या’ राशींच्या प्रेमजीवनात येणार मोठा बदल

Latest Marathi News Live Update : सिन्नरच्या नायगावात गावगुंडांचा कहर! पन्नास हजारांची खंडणी न दिल्यास दुकान पेटवण्याची धमकी

दुबई एअर शोदरम्यान मृत पावलेले विंग कमांडर नमन स्याल कोण होते? पत्नीही वायूदलात अधिकारी...

Maharashtra Politics: राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ! भाजपला झटका, अनेक कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश

SCROLL FOR NEXT