Sharad Pawar Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sharad Pawar : शरद पवारांना मोठा धक्का! माजी केंद्रीय मंत्र्याने सोडली साथ; अजितदादांना दिला पाठिंबा

माजी केंद्रीय मंत्र्यानं राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असून, त्यांनी अजित पवार यांना पाठिंबा जाहिर केला

अंकिता खाणे (Ankita Khane)

अजित पवार आणि समर्थक आमदारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी केल्यानंतर पक्षात फूट पडली. अनेक आमदारांनी, नेत्यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे, तर आणखी काही जण पाठिंबा देत आहेत. वर्ध्यामध्ये शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. वर्ध्यातील माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी आपल्या पन्नास मुख्य पदाधिकाऱ्यांसह सामुहिक राजीनामा दिला आहे.सुबोध मोहिते हे रामटेकमधून खासदार होते. (Latest Marathi News)

राजीनामा देताना आपण विकासाच्या मुद्द्यावर अजित पवार यांना पाठिंबा देत असल्याचं माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. सुबोध मोहिते यांनी आपल्या पदाधिकांऱ्यासह राजीनामा दिला. मोहिते यांच्या या राजीनाम्यामुळे राष्ट्रवादीचे आणखी काही मोठे नेते, पदाधिकारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.(Latest Marathi News)

अजित पवार यांनी शिवसेना भाजप यांच्यासोबत जाण्याच्या निर्णयामुळे राष्ट्रवादीत दोन गट निर्माण झाले. अनेक आमदार अजित पवार यांना पाठिंबा देत आहेत. तर अनेकांनी शरद पवार यांना पाठिंबा देत असल्याचे सांगून अजित पवार यांच्या भेटी घेतल्या. त्यामुळे शरद पवार पुन्हा एकदा पक्ष बांधणी करण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत.(Latest Marathi News)

शरद पवारांनी घेतली येवला येथे सभा

अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार पुन्हा एकदा मैदानात उतरलेत. त्यांनी शनिवारी छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच नाशिक जिल्ह्यातील येवल्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार यांनी राज्यव्यापी दौऱ्याची घोषणा केली होती. त्यातील पहिली सभा नाशिकच्या येवल्यात पार पडली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

Supreme Court March : राहुल गांधींनी व्हिडिओ शेअर करत दिली देशवासियांना 'चलो दिल्ली'ची हाक; सरन्यायाधीशांकडे दाद मागणार

Maharashtra Live News : जातनिहाय जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलमची मागणी; २ नोव्हेंबरला भारत बंदचा निर्णय

Mumbai Protest: मुंबईत वातावरण तापलं, ठाकरे कुटुंब पोलीस स्थानकात; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT