महाराष्ट्र बातम्या

एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या होणार अत्यंसंस्कार

निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशी भावना सर्वच स्तरातून उमटत आहे.

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर - महाराष्ट्राचे ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत प्रा. डॉ. एन. डी पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती कारणाने त्यांना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, आज दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या वर्षी त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. त्यांच्या निधनाने सर्वसामान्यांचा आवाज हरपला, अशी भावना सर्वच स्तरातून उमटत आहे.

उद्या एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. तत्पूर्वी कोल्हापुरातील शाहू कॉलेज सदर बाजार येथे उद्या मंगळवार (ता. 18) रोजी पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी सकाळी 8 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व्यवस्था करण्यात आली आहे. कोरोना नियमांचे पालन करत अंत्यदर्शनासाठी येण्याचे आवाहन केले आले आहे. अंत्यदर्शनासाठी येताना सोशल डिस्टंसिंग आणि तोंडावरती मास्क लावणे बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, कोरोना नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही. तसेच एन.डी. पाटील समाजवादी प्रबोधिनीचे व अंधश्रद्धा निर्मूलन प्रबोधन व विवेकवादी चळवळीचे अग्रणी असल्याने कोणत्याही कर्मकांडाशिवाय त्यांचा अंत्यविधी होणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे केवळ वीस लोकांच्या अर्थात कुटुंबियांच्या उपस्थितीत अंत्यविधी होणार आहे. तरी कार्यकर्त्यांनी शाहू कॉलेजवर अंत्यदर्शनासाठी यावे मात्र अंत्यविधीच्या ठिकाणी गर्दी करू नये आवाहन एन.डी.पाटील यांच्या पत्नी सरोजताई उर्फ माई पाटील व कुटुंबियांनी केले आहे.

दरम्यान, शेतकरी, कष्टकरी, कामगारांचे कैवारी, पुरोगामी चळवळीचे आधारस्तंभ, ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील सर यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायी आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय वाटचालीचा चालता बोलता इतिहास व आम्हा तरुणांचे मार्गदर्शक आज काळाच्या पडद्याआड गेला असल्याची भावना पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. कोल्हापुरातील राजकीय नेत्यांनी सोशन मिडियाद्वारे श्रद्धांजली वाहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Bus Rules: मनमानीला पूर्णविराम! शाळा बस भाडे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण ठरवणार; महाराष्ट्रात नवीन नियमांमुळे चित्र बदलणार

CSK vs DC Controversy: फुल्ल राडा! नितीश राणासह दिल्लीचे कोच अम्पायरला भिडले; सीमारेषेवर भांडण, नेमकं काय घडलं? Video

Mumbai News: मुंबईतील सर्वात मोठ्या डेपोचा ‘टर्निंग पॉइंट’! ‘क्लीन-अप’चा मार्ग मोकळा; स्वच्छतेमुळे बदलणार परिसराचं चित्र

CSK vs DC Live: संजू सॅमसनचे शतक, सर्फराज खानचा अविश्वसनीय झेल अन्...; चेन्नईचा पहिला विजय, IPL 2026 Point Table मध्ये बदल

Vande Bharat Express : पुणे-बंगळूरसाठी आता वंदे भारत स्लीपर एक्स्प्रेस; १३ तासांत पोहोचणार

SCROLL FOR NEXT