Neelam Gorhe AND eKNATH shINDE 
महाराष्ट्र बातम्या

त्यादिवशी कळलं होतं काहीतरी विचित्र घडतयं; नीलम गोऱ्हे यांचा गौप्यस्फोट

सकाळ डिजिटल टीम

पुणे - शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील टीका टिप्पणी आणखी तीव्र होत चालली आहे. त्यातच आज पुरंदर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांचा मोळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवसैनिकांनी आपली खंत बोलून दाखवत नेतृत्वाची पाठिवर थाप हवी, अशी मागणी नेत्यांसमोर केला. तर शिवसेना नेत्या डॉ. निलम गोऱ्हे यांनी विधान परिषद निवडणुकीच्या दिवशी घडलेल्या घडामोडींचा गौप्यस्फोट केला. यावेळी आमदार सचिन आहिर यांनी बडखोर आमदांरावर टीका केली.

दरम्यान कार्यकर्त्यांनी नेत्यांसमोर मनातील खंत बोलून दाखवत मातोश्रीचे दरवाजे आमच्यासाठी बंद असतात, अशी तक्रार केली. आम्ही शिवसेनेसोबतच आहोत. आमच्या पाठिवर थाप द्या, आणि उद्धव ठाकरे यांची भेट घालून द्या, अशी मागणी शिवसैनिकांनी केली.

यावेळी निलम गोऱ्हे यांनी शिवसैनिकांना संबोधित केलं. त्या म्हणाल्या की, विधान परिषदेच्या निवडणूकी वेळी दुपारी लक्षात आलं होतं की, काही तरी विचित्र चाललंय. मतदानाची घाई करत होते. जेवणाची घाई करत होते. उद्धव ठाकरे येणार म्हटलं तरी थांबायला तयार नव्हते. घाईने बाहेर पडले, गाडीत बसले आणि सामान मागवलं. त्याचवेळी बहुतेक जणांना सांगितलं होतं, शिंदे मुख्यमंत्री होणार,असा गौप्यस्फोट निलम गोऱ्हे यांनी केला.

सध्या शिवसेना कोणाची यावरून राजकारण तापल आहे. तर दुसरीकडे निवडणूक आयोगाने देखील एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरेंना शिवसेनेची मालकी कोणाकडे याचे पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून राज्यभरातील पदाधिकांऱ्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution : दिल्लीत श्वास घेणेही कठीण, AQI ४00 च्या वर; २३ भागांत रेड झोन जाहीर

Budh Retrograde 2025: वृश्चिक राशीत बुधाचा वक्री प्रवास सुरू, 'या' राशींना मिळणार यश तर काहींचा वाढणार ताण अन् गैरसमज

Viral Video: महाभारतात युद्धानंतर मृतदेहांसोबत काय घडलं? रात्री सैनिक कुठे थांबत? त्या काळी हॉस्पिटल होतं?; AI व्हिडिओ व्हायरल

Asia Cup: आशिया करंडक भारतात येणार? तोडगा निघण्याची बीसीसीआय सचिवांकडून माहिती

Rahuri Accident: 'बारागाव नांदूर येथे दोन दुचाकींची धडक'; एकाचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी; दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक

SCROLL FOR NEXT