Matheran sakal media
महाराष्ट्र बातम्या

नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मार्गाला कवच; भूस्खलन रोखण्यासाठी वृक्षारोपण

अजय कदम

माथेरान : ब्रिटिशकाळात सुरू झालेल्या नेरळ-माथेरान-नेरळ या नॅरोगेज मार्गावरील (Neral-Matheran mini train) मिनी ट्रेनचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी सगुणा रूरल फाऊंडेशनने (Saguna rural Foundation) पुढाकार घेतला आहे. त्यानुसार या रेल्वेच्या मार्गावरील १८ किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून (Tree Plantation) अशा घटना टाळण्यात येणार आहेत. २००५ मध्ये माथेरान डोंगरात (Heavy rainfall in mountains) झालेल्या अतिवृष्टीपासून हा मार्ग धोकादायक झाला.

Matheran

माथेरानच्या डोंगरात दरवर्षी तब्बल पाच हजार मिलिमीटर पाऊस पडतो. या दरम्यान दरडीच्या घटना घडतात. त्यामुळे मिनी ट्रेनच्या मार्गाची होणारी हानी झाल्याने तिचा मार्ग बंद होतो. ‘सगुणा रूरल टीम’ने मिनी ट्रेनच्या मार्गावर भूस्खलन होऊ नये यासाठी वृक्ष लागवड करण्याचा निश्‍चय केला आहे. त्यानुसार वाला, करवंद, शिंदी, रानकेळी, निर्गुडी आणि घायपात यांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ‘सगुणा’च्या शेखर भडसावळे यांचे आहे.

दृष्टिक्षेप

- मिनी ट्रेनच्या नॅरोगेज मार्गाच्या डोंगर भाग असलेल्या भागात पाच मीटर परिसरात वृक्षलागवड करणार
- दरीच्या भागात जागा उपलब्धतेनुसार वृक्ष लागवड
- या प्रयोगासाठी तब्बल २५००० झाडांची सगुणा रूरल फाऊंडेशनकडून निर्मिती

वाला, करवंदाचे असे आहे महत्त्व

दरडी कोसळू नये आणि डोंगरात भूस्खलन होऊन माती आणि दगड खाली येऊन नुकसान होऊ नये यासाठी वाला ही वनस्पती चांगले काम करते, हे सिद्ध झाले आहे. ही वनसंपत्ती गवताच्या पाटीसारखी असते. उन्हाळ्यात हे झाड सुकले तरी जमिनीमध्ये असलेला कंद मरत नाही. पावसाळा सुरु झाला की पुन्हा माती घट्ट धरून ठेवण्याचे काम सुरू करतो. करवंदाची जाळी नेरळ-माथेरान रेल्वे मार्गात सर्वत्र लावण्यात आली आहे. शिंदी हे झाड माती पकडून ठेवतानाच कोरड्या असलेल्या भागात देखील जिवंत राहते. रानकेळी आणि निर्गुडी हे देखील घायपात प्रमाणे मातीला पकडून ठेवण्याचे काम करतात. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनी ट्रेन मार्गावर २१ किलोमीटरपैकी १८ किलोमीटर भागात ही सर्व झाडे सगुणा रूरल फाऊंडेशनकडून लावण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic : पुण्यातील सिंहगड रोड, वारजेत वाहनांच्या लांबच लांब रांगा, अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे वाहतूक वळवल्याने वाहतूक कोंडी

Kolhapur Rain Weather : कोल्हापुरातील सहा धरणांतून १२ हजार क्युसेक विसर्ग, राधानगरी धरण ७० टक्क्यांवर; पावसाचा जोर वाढणार

अधिवेशनात खंडाजंगी! अत्याचार प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करा: आमदार रोहित पवार आक्रमक; पोलिसांवर कोणाचा दबाव?

Latest Maharashtra News Updates : अंधेरीत खंडणीसाठी पानटपरीवाल्याचे अपहरण; दोन पोलिसांसह चौघांना अटक

Ashadhi Ekadhashi 2025: यंदा 5 की 6 जुलै कधी आहे आषाढी एकादशी? जाणून घ्या शुभ मुहुर्त अन् पूजा करण्याची विधी

SCROLL FOR NEXT