Punyashlok Ajilyadevi Holkar solapur univercity Esakal
महाराष्ट्र बातम्या

१२ जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष! विद्यापीठाने ५ दिवसांत लावले १७ अभ्यासक्रमांचे निकाल; उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीसाठी ७०० ते ८०० रुपये शुल्क, वाचा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाने १७ अभ्यासक्रमांचे निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत जाहीर करीत नवा विक्रम केला आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तर पारंपरिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाइन तपासले जात आहेत. आता परीक्षेच्या निकालानंतर १२ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

तात्या लांडगे

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाने १७ अभ्यासक्रमांचे निकाल परीक्षा संपल्यानंतर अवघ्या पाच दिवसांत जाहीर करीत नवा विक्रम केला आहे. सध्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन तर पारंपरिक अभ्यासक्रमांचे पेपर ऑफलाइन तपासले जात आहेत. आता परीक्षेच्या निकालानंतर १२ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.

विद्यापीठाच्या परीक्षा ३० एप्रिलपर्यंत संपविण्याचे नियोजन होते, पण व्यावसायिक अभ्यासक्रमांचे केंद्रीय ‘सीईटी’मुळे विद्यापीठाची परीक्षा १५ दिवस लांबली. आता ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा संपली, त्यांना उन्हाळी सुट्टी लागली. तत्पूर्वी निकालानंतर विद्यार्थ्यांना १५ दिवसांत उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी घेता येणार आहे. ज्यातील ज्यांना उत्तरपत्रिकेतील तपासणीवर आक्षेप आहे, त्या विद्यार्थ्यांना पुढील सात दिवसांत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करता येणार आहे. त्यावेळी पारंपरिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी प्रत्येकी ५०० रुपये आणि पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास ३०० रुपये भरावे लागणार आहेत. तर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपीसाठी ५०० रुपयेच, पण पुनर्मूल्यांकनासाठी २०० रुपये मोजावे लागणार आहेत.

दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक १५ दिवस पुढे ढकलावे लागल्याने आता निकाल केवळ १५ दिवसांंतच जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे. त्यासाठी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे हे प्राध्यापकांच्या दररोज संपर्कात आहेत.

...तर प्राध्यापकांनाही घेता येईल उन्हाळा सुट्टीचा आनंद

कुलगुरु, प्र-कुलगुरु, कुलसचिव यांच्या मार्गदर्शनाखाली संलग्नित सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापकांच्या सहकार्यामुळे परीक्षेनंतर अवघ्या काही दिवसांतच निकाल जाहीर होत आहेत. सर्वच अभ्यासक्रमांचे निकाल १५ दिवसांत जाहीर करण्याचे नियोजन आहे. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढचे प्रवेश वेळेत घेता येतील आणि प्राध्यापकांनाही उन्हाळा सुट्टीचा आनंद घेता येईल.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ

‘या’ अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर

एमए-रुरल डेव्हलपमेंट (सेमिस्टर एक), एमए-हिंदी, मास कम्युनिकेशन (सेमिस्टर तीन-रिपिटर), एमए-म्युझिक (तबला, पखवाज-सेमिस्टर दोन), एमएससी-एप्लाइड जियोलॉजी (सेमिस्टर-चार), एमएससी-इंडस्ट्रियल केमिस्ट्री (सेमिस्टर-तीन रिपिटर), एमए-मराठी (कॅम्पस- सेमिस्टर एक रिपिटर), एमए प्राकृत (सेमिस्टर-चार), एमएससी-बायोलॉजी (सेमिस्टर-तीन रिपिटर), एमए-कन्नड (सेमिस्टर- तीन रिपिटर), एम.एड. (सेमिस्टर-तीन, रिपिटर), एमएससी-फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स (सेमिस्टर-दोन रिपिटर), जेएमसी (सेमिस्टर पाच रिपिटर), एमए-ड्रामास्टिक (सेमिस्टर दोन, रिपिटर), एमए-हिस्टरी (सेमिस्टर तीन रिपिटर), एमए-कन्नड (सेमिस्टर एक-रिपिटर) या अभ्यासक्रमांचे निकाल परीक्षेनंतर अवघ्या पाच दिवसांत जाहीर झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US-Iran MoU Signed: मोठी बातमी! अमेरिका-इराण यांच्यातील सामंजस्य करारावर दोन्ही देशांच्या स्वाक्षऱ्या; 'या' दिवशी पूर्ण क्षमतेने सुरु होणार 'होर्मुज'

Vidhan Parishad Election : गंगापूरमध्ये महायुती विरुद्ध मविआ लढत; ३३ पैकी ३१ मते महायुतीकडे, तरीही निकालाकडे तालुक्याचे लक्ष

IND vs AFG, ODI: 'रोहित शर्माची काहीच चूक नव्हती...' शुभमन गिलसोबतच्या रनआऊट वादावर आर अश्विन स्पष्टच बोलला

Karad Airport Issue : कऱ्हाड विमानतळ घेईना ‘टेक-ऑफ’! विस्तारीकरणासाठी २२१ कोटी मंजूर होऊनही कार्यवाही संथच

Janhavi Virkar : बारामतीच्या लेकीची भारताच्या जर्सीपर्यंत झेप; सावळच्या जान्हवीची भारतीय महिला अंडर-१९ क्रिकेट संघात निवड

SCROLL FOR NEXT