zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालकांचे नवे आदेश! प्राथमिक शाळा सकाळी ७ ते ११.१५ पर्यंत तर माध्यमिक शाळांची वेळ आता सकाळी ७ ते ११.४५ वाजेपर्यंत राहणार

राज्यातील सर्वच शाळांच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सुर्यवंशी यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार आता शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर (तात्या लांडगे) : राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा लहान मुलांच्या (प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी) आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्यासंदर्भातील निवेदने शिक्षण संचालकांकडे प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच शाळांच्या वेळा एक असाव्यात असा आदेश प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी व माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक संपत सुर्यवंशी यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यानुसार आता शाळांच्या वेळा पुन्हा बदलणार आहेत.

उन्हाळ्यातील अध्यापनाचे असे राहील नियोजन

  • (प्राथमिक शाळा)

  • नियोजन वेळ

  • परिपाठ सकाळी ७ ते ७.१५

  • तासिका-१ सकाळी ७.१५ ते ७.४५

  • तासिका-२ सकाळी ७.४५ ते ८.१५

  • तासिका-३ सकाळी ८.१५ ते ८.४५

  • तासिका-४ सकाळी ८.४५ ते ९.१५

  • भोजन सुट्टी सकाळी ९.१५ ते ९.४५

  • तासिका-५ सकाळी ९.४५ ते १०.१५

  • तासिका-६ सकाळी १०.१५ ते १०.४५

  • तासिका-७ सकाळी १०.४५ ते ११.१५

(माध्यमिक शाळा)

  • नियोजन वेळ

  • परिपाठ सकाळी ७ ते ७.१५

  • तासिका-१ सकाळी ७.१५ ते ७.४५

  • तासिका-२ सकाळी ७.४५ ते ८.१५

  • तासिका-३ सकाळी ८.१५ ते ८.४५

  • तासिका-४ सकाळी ८.४५ ते ९.१५

  • भोजन सुट्टी सकाळी ९.१५ ते ९.४५

  • तासिका-५ सकाळी ९.४५ ते १०.१५

  • तासिका-६ सकाळी १०.१५ ते १०.४५

  • तासिका-७ सकाळी १०.४५ ते ११.१५

  • तासिका-८ सकाळी ११.१५ ते ११.४५

शाळा तथा मुख्याध्यापकांना ‘या’ सूचना

  • कडक उन्हामुळे विद्यार्थ्यांच्या मैदानी, शारीरिक हालचाली टाळाव्यात, बाहेर मैदानात वर्ग घेऊ नयेत

  • उष्णतेपासून बचाव कसा करायचा हे विद्यार्थ्यांना शिकवावे

  • वर्गातील पंखे सुस्थितीत असावेत, विद्यार्थ्यांना थंड पाणी उपलब्ध करुन द्यावे

  • टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबीर आणि स्थानिक फळे व भाज्या, हंगामी फळे खायला सांगणे

  • पातळ, सैल, सुती आणि हलक्या रंगाचे कपडे घालावेत; उन्हात शक्यतो बाहेर पडणे टाळावे

  • उन्हात बाहेर जाताना पायात चप्पल किंवा शूज असावेत, डोक्यावर छत्री, टोपी, टॉवेल, उपरणे असावे

अशी असणार आता शाळा भरण्याचा व सुटण्याची वेळ

  • प्राथमिक शाळा : सकाळी सात वाजता शाळा भरतील व शाळा सुटण्याची वेळ ११.१५ राहील

  • माध्यमिक शाळा : सकाळी सात वाजता शाळा भरतील आणि ११.४५ वाजता सुटतील

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AUS vs IND: श्रेयस अय्यरने मागे पळत जात भारी कॅच घेतला, पण लगेचच मैदानातून जावं लागलं बाहेर; नेमकं काय घडंल? पाहा Video

Jaykumar Gore : '...तर पंतप्रधान मोदींसोबत चहा पिण्याची संधी मिळणार'; मंत्री जयकुमार गोरेंनी सांगितलं 'हे' खास कारण

Kolhapur Crime : गोव्याला फिरायला गेले अन् बंद बंगला फोडून साडेतेरा तोळे दागिने पळविले, श्वान घराच्या भोवतीच घुटमळलं अन्

Nanded Crime : विवाहित महिलेसोबत प्रेमसंबंध, हात-पाय बांधून नांदेडच्या तरुणाला बेदम मारहाण; अंगाला गरम चटके देऊन केला छळ

CSIR UGC NET December 2025: सीएसआयआर यूजीसी नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढ; जाणून घ्या नवीन वेळापत्रक

SCROLL FOR NEXT