Indira Gandhi Maharashtra Assembly Sakal
महाराष्ट्र बातम्या

New Parliament : डोक्यावर पदर, नाकात नथ! इंदिरा गांधींनी ठसक्यात नऊवारी नेसून केलेलं विधानभवनाचं उद्घाटन

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या वाद सुरू आहे.

वैष्णवी कारंजकर

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावरुन सध्या वाद सुरू आहे. या वादामध्ये इंदिरा गांधी यांचंही नाव भाजपाकडून घेतलं जात आहे. इंदिरा गांधी यांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन झालं होतं.

महाराष्ट्राच्या विधानभवनाचं उद्घाटन १९ एप्रिल १९८१ रोजी झालं होतं. या उद्घाटनासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी महाराष्ट्रात आल्या होत्या. या विधानभवनाच्या इमारतीच्या बांधकामासाठी त्या काळी सुमारे दहा कोटी रुपये खर्च आला होता.

सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून बॅकबे रेक्लेमेशनवर मंत्रालयासमोरील जागेत उभारण्यात आलेल्या विधान भवनाच्या नव्या उत्तुंग व डौलदार

वास्तुचे उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते पार पडलं. या वास्तुचा उल्लेख पंतप्रधानांनी "लोकशाहीचे मंदिर" असा केला होता.

विधानभवनाचे उद्घाटन करण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी किरमिजी रंगाची नऊवारी साडी नेसून व डोक्यावर पदर घेऊन व्यासपीठावर येताच हे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्यांचे स्वागत केलं होतं.

वाद काय आहे?

भारताच्या नव्या संसद भवनाचं लवकरच उद्घाटन होणार आहे. या इमारतीच्या उद्घाटनावरुन वादाला सुरुवात झाली आहे. हे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते न होता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावं, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. तर इंदिरा गांधींनी उद्घाटन केलं तर चालतं मग मोदींना विरोध का असा सवाल भाजपाने उपस्थित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LIC Stock: सरकारचा एक निर्णय आणि एलआयसीचे शेअर्स कोसळले, गुंतवणूकदारांची चिंता वाढली

Beed News: मृत घोषित केलेले बाळ अंत्यसंस्कारावेळी रडले; बीडच्या अंबाजोगाईत धक्कादायक घटना, नेमकं काय घडलं?

Shubhanshu Shukla : पृथ्वीवरून कसे दिसते अंतराळ स्थानक? वेधशाळेने टिपले अद्भुत दृश्य, शुभांशु शुक्ला अन् त्यांच्या यानाचे फोटो पाहा..

Eknath Shinde: मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस; शिवसेनेच्या आणखी एका मंत्र्याला झटका

Yash Dayal: ८ लाख, तरुणीची टोळी अन्...; अखेर अत्याचाराच्या आरोपावर यश दयालने मौन सोडलं, धक्कादायक खुलासे करत पोलिसात धाव!

SCROLL FOR NEXT