New Parliament was built without trust Sharad Pawar criticized central government politics
New Parliament was built without trust Sharad Pawar criticized central government politics esakal
महाराष्ट्र

New Parliament Building : विश्वासात न घेता नवी संसद उभारली; शरद पवार यांची केंद्र सरकारवर टीका

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संसद भवनाच्या नव्या इमरतीच्या उद्घाटन सोहळ्यावरून वाद रंगलेला असताना विरोधी पक्षांनी उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार घातला आहे. विरोधकांच्या भूमिकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाठिंबा देत " संस्थेची नवी इमारत बांधली जाणार असल्याचे मी वृत्तपत्रांमध्येच वाचले होते. ही इमारत बांधताना कोणाला विश्वासात घेतले नाही," अशी टीका पवार यांनी केंद्र सरकारवर केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी नव्या संसद भवनाचे उद्घाटन होत आहे. नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करावे अशी मागणी विरोधी पक्षांनी करत मोदी सरकारवर टीका केलेली आहे.तसेच या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलेला आहे. त्याबाबत शरद पवार यांनी आज पुण्यात त्यांची भूमिका स्पष्ट केली.

शरद पवार म्हणाले, “अनेक वर्षापासून मी संसदेचा सदस्य आहे. संसदेची नवी इमारत बांधली जाणार हे आम्ही वर्तमानपत्रात वाचलं. असा महत्वाचा निर्णय घेताना संसदेच्या सदस्यांना विश्वासात घेण्याची गरज होती. भूमिपूजन करतानाही कोणाला विश्वासात घेतलं नाही. आता इमारत तयार झाली आहे.”

संसदेची सुरूवात राष्ट्रपतींच्या उपस्थितीने होते. पण, राष्ट्रपतींनी संसदेचं उद्घाटन करावं, हे सुद्धा मान्य करण्यात आलं नाही. त्यामुळे कोणाला विश्वासात न घेताच सर्व निर्णय घ्यायचे असतील, तर विरोधी पक्षातील काही ज्येष्ठ सहकाऱ्यांनी आपण संसदेच्या उद्घाटनाला जाऊ नये अशी भूमिका मांडली. त्या भूमिकेला माझा पाठिंबा आहे,” असं शरद पवारांनी सांगितलं.

आमदारांच्या अपात्र बाबत विधानसभेच्या अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाकडून शिवसेना पक्षाची घटना मागवली आहे याबाबत विचारले असता "याचा अर्थ असा, की निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अंतिम निर्णय आल्यावर प्रतिक्रिया देणं योग्य होईल,” असं शरद पवारांनी स्पष्ट केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accident: पुण्यात दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाचे वडिल पोलिसांच्या ताब्यात; संभाजीनगरमधून केले अटक

Mumbai Election: सोमवारी ठाकरे गटाच्या पोलिंग एजेंटचा टॉयलेटमध्ये मृत्यू, तर निवडणूक अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू

Yoga Tips : थकवा अन् अशक्तपणापासून आराम मिळवण्यासाठी दररोज करा 'ही' योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत

Kalyani Nagar Accident : पुणेकरांच्या तीव्र प्रतिक्रिया...फक्त सामान्य नागरिकांनाच कायदे लागू आहेत का?

Latest Marathi News Live Update: 300 ग्रामपंचायतींच्या प्रशासक नियुक्तीला स्थगिती

SCROLL FOR NEXT