

मुंबई- देशासह राज्यात सोमवारी पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. महाराष्ट्रातील १३ मतदारसंघामध्ये मतदान झाले आहे. जास्त लक्षवेधी ठरले ते मुंबई, ठाण्यातील मतदान. लोकांना मतदान करताना मनस्ताप सहन करावा लागला आहे. कारण, निवडणूक प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरु होती. मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक प्रक्रियेदरम्यान दोन जणांचा मुंबईत मृत्यू झालाय.
शिवसेना ठाकरे गटाचे पोलिंग एजेन्ट मनोहर नलगे (वय ६२) यांचा निवडणूक कर्तव्यावर असताना मृत्यू झालाय. वरळीच्या डेलीसले रोडवरील मतदान केंद्रातील टॉयलेटमध्ये ही घटना घडली. आजारी पडल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी आरोर केलाय की, त्याठिकाणी निवडणूक आयोगाकडून आवश्यक त्या सुविधा पुरवण्यात आल्या नव्हत्या.
एका दुसऱ्या घटनेमध्ये निवडणूक अधिकाऱ्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झालाय. रिपोर्टनुसार, सुनिल लक्ष्मन (वय ५२) यांना परेळमधील भोईवाडातील सेंट पॉल हाय स्कूलमध्ये ड्युटी लावण्यात आली होती. त्यावेळी त्यांना झटका आला. त्यानंतर त्यांना केईएम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. पण, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा पुरवल्या गेल्या नसल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला होता. ते म्हणाले होते की, 'अनेक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा देखील नाहीत. ईव्हीएममशीन देखील व्यवस्थित काम करत नाहीत.' आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे याची नोंद घेण्याची मागणी केली होती.
मुंबईतील अनेक मतदान केंद्रावर गोंधळ पाहिला मिळाला. अनेक ईव्हीएम मशिन बंद पडले होते किंवा काही ठिकाणी व्हीव्हीपॅटमधून पावती येत नसल्याचं समोर आलं. लोकांना तासंतास मतदान केंद्रावर उभे राहावे लागले. मुंबईतील सहा लोकसभा जागेसाठी मतदान काल पार पडले. राज्यातील एकूण १३ लोकसभा जागेवरील मतदारांचे भविष्य ईव्हीएममध्ये बंद झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.