महाराष्ट्र बातम्या

आता कैद्यांचा मुक्काम तुरुंगात नव्हे; तर...

दिलीप कुऱ्हाडे

पुणे : राज्यातील कारागृहातील कैद्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून प्रशासनाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृह संपूर्णपणे लाॅकडाऊन केले आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या कैद्यांची सोय चक्क शाळा आणि महाविद्यालयांत केली आहे. त्यामुळे कैदी अशा शाळा व महाविद्यालयात पुन्हा संस्काराचे धडे गिरवतील की कुसंगतीमुळे गुन्हेगारी क्षेत्रात आल्याचा पश्‍चाताप करतील हे सांगणे अवघड आहे. तरी सुद्धा कैद्यांना शाळेतील भूतकाळ आठवला असणार (नॉस्टेलजिया) हे मात्र नक्की आहे. 

राज्यात ६० कारागृहे आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कारागृह प्रशासनाने मध्यवर्ती व जिल्हा कारागृहे संपूर्णपणे लॉकडाउन केले आहे. त्यामुळे नवीन आलेल्या कैद्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्‍न प्रशासनाला पडला होता. त्यामुळे त्यांनी प्रमुख शहरातील शाळा, महाविद्यालयाला तात्पुरत्या कारागृहाचे स्वरूप दिले आहे. या ठिकाणी नवीन येणाऱ्यांना कैद्यांना ठेवण्यात आले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सातारा, सांगली, कोल्हापूर, नाशिक, धुळे, रायगड, ठाणे, यवतमाळ अशा ठिकाणच्या जिल्हा व मध्यवर्ती कारागृहांचा तात्पुरता पत्ता स्थानिक शाळा व महाविद्यालय आहेत. तर येरवडा मध्यवर्ती कारागृह मुलींच्या वसतिगृहात, बुलडाणा जिल्हा कारागृह ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात, वाशिम कारागृह शासकीय बहुद्देशीय अंपग केंद्रात, सिंधुदुर्ग कारागृहाचे रूपांतर प्राध्यापक महाविद्यालयात केले आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्यातील जवळपास दीड हजार कैद्यांचा मुक्काम अशा शाळा व महाविद्यालयात आहे. त्यामुळे शाळेच्या भिंती, फळे, शाळेतील सुविचार वाचल्यानंतर कैद्यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला असणार. त्यांना या ठिकाणी येण्या पर्यंतचा प्रवास नक्की आठवला असणार. त्यांनी केलेल्या कृत्याचा पश्‍चाताप झाला असणार कि पुन्हा या शाळेतून जीवनात चांगला नागरिक होणार असल्याचे ठरविले असणार असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. 

कैद्यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहात!

अकोला जिल्हा कारागृहाला कैद्यांना ठेवण्यासाठी सुरक्षित जागा न मिळाल्यामुळे त्यांनी चक्क कैद्यांच्या मुक्कामाची सोय शासकीय विश्रामगृहात केली आहे. याठिकाणी प्रशासनाने २५ कैद्यांना ठेवले आहे. त्यामुळे कैदी कारागृहातील मुक्काम वाढू दे अशी प्रार्थना देवाकडे करत नसतील तर नवलच म्हणावे लागेल. 

कारागृह - कैदी संख्या - ठिकाण
*येरवडा - १३० - मुलींचे वसतिगृह
*सातारा - ७३- महाविद्यालय
* सांगली- ५७- महाविद्याल
* नाशिक - ७१ -शाळा
*रायगड - १७२ - शाळा
* अमरावती - ७३ - दृष्टीहीन मुलांची शाळा

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT