New textbook scheme single book for 1st to 7th class student sakal
महाराष्ट्र बातम्या

पहिली ते सातवीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना एकच पुस्तक

यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना राबविणार

दिलीप वैद्य

रावेर : पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे आता कमी होणार आहे. यासाठी सात विविध विषयांची पुस्तके एकाच वेळी शाळेत नेण्याऐवजी या संपूर्ण अभ्यासक्रमाची तीन भागांत विभागणी करून एकच पुस्तक न्यावे लागणार आहे. तसेच हे पुस्तक तयार करताना गणित आणि विज्ञान या विषयांत ठिकठिकाणी मराठीबरोबरच इंग्रजीतील संकल्पनांचाही वापर केल्याने विद्यार्थ्यांना आता द्विभाषिक पाठ्यपुस्तक या शैक्षणिक वर्षांपासून उपलब्ध होत आहे. यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक विभागाने ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ तयार केली असून, तिची अंमलबजावणी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून सुरू होत आहे.

प्रमाणापेक्षा जास्त वजनाचे दप्तर वाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी, मान दुखणे, डोकेदुखी, मानसिक ताण असे अनेक आजार निर्माण होत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी शासन स्तरावरून विविध उपाययोजना आणि सूचना यांची अंमलबजावणी केली जात आहे. यानुसार पहिली ते सातवी या इयत्तानिहाय सर्व विषयाच्या आशयाचे एकत्रीकरण करून पाठ्यपुस्तकांचे तीन भाग तयार करण्यात आले असून, हे भाग स्वतंत्रपणे विद्यार्थ्यांना वार्षिक वेळापत्रकानुसार एक-एक करून स्वतंत्रपणे शाळेत सोबत घेऊन जाता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना बालभारती (मराठी), सुलभभारती (हिंदी), इंग्रजी, गणित आणि विज्ञान (द्विभाषिक), इतिहास व नागरिकशास्त्र आणि भूगोल या सात विषयांची वेगवेगळी पुस्तके शाळेत नेण्याऐवजी एकच पुस्तक शाळेत नेता येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे नक्कीच कमी होणार आहे.

एकात्मिक पाठ्यपुस्तक योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या या पाठ्यपुस्तकांमध्ये सर्व विषयांचा साधारणपणे तीन महिन्यांच्या कालावधीत वर्गात होणाऱ्या अध्ययन-अध्यापन प्रक्रियेसाठी आवश्यक असा आशय समाविष्ट केलेला आहे. शाळा उघडण्याच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना या एकात्मिक द्विभाषिक पाठ्यपुस्तकाचे विनामूल्य वितरण केले जाणार आहे.

प्रथमच द्विभाषिक पुस्तके

महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळाने या वेळी तीन भागांतील पुस्तके उपलब्ध करून दिली असून, सर्वच विद्यार्थ्यांना विनामूल्य वितरित केली जाणार आहेत. पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित आणि विज्ञान या विषयाच्या संदर्भात विविध संबोध, संकल्पना यांचे इंग्रजी अर्थ समजावेत, विषय सोपा वाटावा यासाठी मराठी शब्दांपुढे इंग्रजी शब्द देण्यात आले आहेत. तसेच त्या अनुषंगाने येणाऱ्या भाषेतील काही मराठी शब्दांचे इंग्रजी भाषेतील शब्दही दिलेले आहेत. त्यानुसार आता गणित आणि विज्ञान या दोन विषयांचे स्वरूप आता द्विभाषिक झाले आहे.

विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी व्हावे, अशी खूप दिवसांपासूनची शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे. विद्यार्थ्यांना सातऐवजी एकच पुस्तक शाळेत आणावे लागेल. तसेच द्विभाषिक पाठ्यपुस्तकामुळे मराठी शाळांमध्येही आता गणित, विज्ञान या विषयांचे सेमी इंग्लिशसारखे शिक्षण मिळेल.

- एस. आर. पाटील, उपशिक्षक, पाटील विद्यालय, बलवाडी (ता. रावेर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC Election: महायुतीत जागावाटपावरून तणाव! ‘नो कॉम्प्रोमाइज’ मोडमध्ये शिंदेसेना; ७ जागांसाठी आक्रमक भूमिका घेत भाजपवर दबाव

SRH vs RCB Live: विराट कोहलीच्या नावावर वर्ल्ड रेकॉर्ड! गतविजेत्यांनी मोठा डाव टाकला अन् किंग कोहली जगात 'सुपर डुपर' ठरला

NEET Paper Leak प्रकरणात मोठा खुलासा! भौतिकशास्त्राचा पेपर लीक करणारी मुख्य सूत्रधार मनिषा हवालदार; कसा आखला डाव?

Hasan Mushrif Sharad Pawar : हसन मुश्रीफांनी संपलेला विषय पुन्हा काढला, "शरद पवारांना आमदार प्रेमापोटी भेटले असतील"; संजय शिरसाठांवरही केलं भाष्य

Mumbai Health Alert: साखर कमी खाल्ली तरी मधुमेह का होतो? मुंबईतील वाढत्या केसेसमागचं विज्ञान आणि जीवनशैलीतील धक्कादायक कारणं

SCROLL FOR NEXT