Kirit Somaiya Esakal
महाराष्ट्र बातम्या

Kirit Somaiya : नवीन वर्ष अन् नवे नेते; घोटाळे बाहेर काढणार म्हणत सोमय्यांनी निवडली नावं!

2022 वर्ष सरत असतानाच लोक नवनवे संकल्प करत असताना आपल्याला पाहायला मिळतात

सकाळ डिजिटल टीम

2022 वर्ष सरत असतानाच लोक नवनवे संकल्प करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. याचपार्श्वभूमीवर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्विट करत नव वर्षातील आपले नवे निशाणे जाहीर केले आहेत. यात त्यांनी महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षातील नेत्यांची नावं जाहीर केली आहेत.

याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. नव्या वर्षात नवे घोटाळे बाहेर काढणार असल्याचेही किरीट सोमय्या यांनी जाहीर केलं आहे. याबाबतचं ट्विट करत त्यांनी 5 नेत्यांची नावं जाहीर केली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे आणि त्यांचं कुटुंब, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचं साई रिसॉर्ट प्रकरणही किरीट सोमय्या यांच्या निशाण्यावर असणार आहे. यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, काँग्रेसचे नेते अस्लम खान आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या नावाचाही उल्लेख किरीट सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

नव्या वर्षात ठाकरे कुटुंबाचे 19 बंगले. अनिल परब यांचा साई रिसॉर्ट, अस्लम शेख यांचे 49 स्टुडिओ, हसन मुश्रीफ आणि पेडणेकर यांचे मुंबई महापालिकेतील घोटाळा, SRA च्या घरांमधील घोटाळा या गोष्टी नव्या वर्षामध्ये आपल्या निशाण्यावर असतील असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News : अंधश्रद्धेचा कहर! मुलगा बरा व्हावा म्हणून आईने भोंदू मांत्रिकाच्या सांगण्यावरुन दिला मुलीचा नरबळी, राज्यात खळबळ

Latest Marathi News Live Update : यवतमाळमध्ये आशा स्वयंसेविकांचे काळे कपडे घालून आंदोलन

Ahilyanagar gas Pipeline: अहिल्यानगरवासियांची प्रतीक्षा संपली; गॅस पाइपलाइनचा मार्ग मोकळा; तत्काळ काम सुरू करण्याचे शासनाचे आदेश!

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

SCROLL FOR NEXT