दृष्टिक्षेप
दृष्टिक्षेप 
महाराष्ट्र

मुंबई-औरंगाबाद प्रवास केवळ दीड तासात शक्‍य!

आदित्य वाघमारे

औरंगाबाद - मुंबईहून औरंगाबादला रेल्वेने येण्यासाठी सध्या लागणारा सहा ते आठ तासांचा कालावधी कमी होऊन अवघ्या 1 तास 29 मिनिटांवर येऊ शकतो. स्पेनच्या
साथीने केंद्र सरकारने हाती घेतलेल्या हायस्पीड रेल्वे प्रकल्पाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे. मुंबई-नाशिक अंतर केवळ 47 मिनिटांत, तर मुंबई-नागपूर अंतर तीन तास 34 मिनिटांत कापता येणे शक्‍य आहे. 772.36 किलोमीटर लांबीची ही लाइन तीन टप्प्यांत 2035 पर्यंत पूर्ण होऊ शकते, असेही या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. 2050 पर्यंतची संभाव्य वाढ लक्षात घेऊन हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यात आला आहे. 

स्पेन सरकारच्या सहकार्यातून "डायमंड क्वॉड्रीलॅटरल' प्रकल्पासाठीचा अहवाल "इनेको' आणि "अडीफ' या स्पॅनिश कंपन्यांनी भारत सरकारच्या नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनसाठी (एचएसआरसी) तयार केला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मुंबई-नागपूरदरम्यान 772.36 किलोमीटरचा हायस्पीड रेल्वेमार्ग असून, तो तीन भागांत 2035 पर्यंत उभा केला जाऊ शकतो, असे या अहवालात नमूद केले आहे. पारंपरिक रेल्वेमार्गाने मुंबई-नागपूर (औरंगाबाद मार्गे) गेल्यास बारा तासांपेक्षा अधिक कालावधी लागतो. हायस्पीड रेल्वेने हे अंतर तीन तास 34 मिनिटांवर येऊ शकेल. यातील मुंबई-नाशिक टप्पा 2025, मुंबई-नाशिक-औरंगाबाद टप्पा 2030, तर मुंबई-नागपूर-औरंगाबाद-नागपूर मार्ग 2035 पर्यंत पूर्ण केला जाऊ शकेल. 2050
पर्यंत डायमंड क्वॉड्रीलॅटरलचा मुंबई-कोलकाता हा एक टप्पा पूर्ण होऊ शकणार आहे, असे अहवालात म्हटले आहे. 

काय आहे पार्श्वभूमी? 
भारत सरकारने 2015 मध्ये स्पेनच्या अर्थमंत्रालयाला मुंबई-कोलकाता कॉरिडॉरमधील मुंबई-नागपूर या पहिल्या टप्प्याचा हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचा अभ्यास करण्यास सांगितले होते. त्यानुसार "अडीफ', "इनेको' या कंपन्यांच्या 80 लोकांनी 24 महिने अभ्यास, सर्वेक्षण करून हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनला तांत्रिक, आर्थिक, पर्यावरणीय पैलूंचा अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. यातून अकरा हजार किलोमीटर लांबीची डबल लाइन टाकून मुंबई, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई ही महत्त्वाची शहरे जोडण्याचा विचार केंद्राचा आहे. 
 

तपासल्या तीन मार्गांच्या शक्‍यता 
मागणीचा आधार घेऊन सुरवातीला दहा आणि नंतर त्यातील तीन मार्गांच्या पर्यायांवर खोलवर अभ्यास करण्यात आला. या तीन पर्यायांवर उभारणी, चालविण्याचा खर्च, प्रवासाची वेळ या निकषांवर अभ्यास करण्यात आला आहे. त्यातील सर्वोत्तम मार्ग (अल्टरनेटिव्ह 2) हा मुंबई बीकेसी ठाणे-नाशिक-औरंगाबाद-अकोला-बडनेरा, अमरावती-नागपूर असा निवडण्यात आला. यामध्ये रेल्वेच्या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी, विद्युतीकरण, अग्रक्रमाने करण्याची कामे, पाच स्थानके, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आदी विषयांवर आधारित हा अहवाल तयार झाला आहे. या
प्रकल्पाच्या उभारणीसाठीचा खर्च मात्र गुलदस्त्यात आहे. 
 
नागपूर-अहमदाबाद व्हाया ठाणे 
नागपूर ते मुंबई हा हायस्पीड रेल्वे ट्रॅक अहमदाबाद शहरातून येणाऱ्या मुंबईपर्यंतच्या ट्रॅकला ठाण्यात मिळणार असल्याचे अहवालात नमूद आहे. युरोपियन स्टॅंडर्डच्या आधारे झालेल्या या अभ्यासातून या 772.36 किलोमीटरच्या मार्गावर 526 स्ट्रक्‍चर उभारावे लागणार आहेत, जे या ट्रेकला एका उंचीवर सामान पद्धतीने ठेवण्यास मदत करतील. स्टेशन, दीड किलोमीटरपेक्षा जास्ती लांबीच्या बोगद्यांशिवाय हा संपूर्ण ट्रॅक भराव घालून केलेल्या उंचवट्यावर अंथरला जाणार आहे. रेल्वेची धाव विनाबाधा ठेवण्यासाठी प्रत्येक 40 ते 60 किलोमीटरवर सायडिंग (रेल्वे थांबण्यासाठी अतिरिक्त ट्रॅक), तर प्रत्येक वीस ते तीस किलोमीटरवर क्रॉसओव्हर (रेल्वे एका ट्रॅकहून दुसऱ्या ट्रॅकवर नेणारी यंत्रणा) प्रस्तावित आहेत. 
 
आठ बोगदे प्रस्तावित 
जिथे तीस मीटरपेक्षा अधिक उंच डोंगर कापावा लागेल तिथे बोगदा करावा लागणार आहे. त्यानुसार मुंबई-नागपूर मार्गावर आठ बोगदे करावे लागणार आहेत. यातील एका ठिकाणी सात किलोमीटर लांबीचा दुहेरी बोगदा अपेक्षित आहे. जिथे 15 मीटरपेक्षा अधिक तटबंदी असेल. त्यासह काही अतिरिक्त बांधकाम करावे लागणार आहे. अशी एकूण 526 कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. दर दीडशे किलोमीटरवर दुरुस्ती केंद्रे असतील. ती शहरांजवळ असतील. रेल्वे उभारण्याची जागा ठाणे, नाशिक येथे असेल. या मार्गावर बारा विजेची सबस्टेशन असतील, जी या रेल्वेला 350 किमी प्रतितास वेगावर घेऊन जातील.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT