Maharashtra Assembly Election Sakal
महाराष्ट्र बातम्या

Assembly Election Survey : शिंदेंच्या बंडाचा फायदा भाजपला! २०२४ च्या विधानसभेत कोणाला किती जागा? पाहा सर्व्हे

रोहित कणसे

Maharashtra Assembly Election Survey 2023 : आगामी वर्ष हे निवडणूकांचे वर्ष असणार आहे. लोकसभा निवडूक २०२४ तसेच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. भाजपला २०२४ च्या लोकसभा निवडणूकीत सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी विरोधकांकडून एकजूटसाठी प्रयत्न केले जात आहेत.

यादरम्यान राज्यातील विधानसभेच्या निवडणूकीचा निकाल काय असेल याबद्दल एका सर्व्हेक्षणाचे निकाल समोर आले आहेत. 'न्यूज एरिना इंडिया' या संस्थेने केलेल्या या सर्व्हेत महाराष्ट्रात भाजपला तब्बल सव्वाशे जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

या सर्व्हेतून विधानसभा निवडणूकीबद्दल अनेक अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत सध्याच्या घडीला भाजपा 123-129 तर एकनाथ शिंदेंची शिवसेना 25 जागा मिळवेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

इतर पक्षांबद्दल बोलायचे झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 55-56, काँग्रेस 50-53 तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 17-19 आणि इतर 12 जागा मिळवतील असे सांगण्यात आले आहे.

यासर्व्हेमध्ये भाजप महाराष्ट्रात आतापर्यंतची सर्वोच्च संख्या गाठेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीचा सर्वाधिक फायदा काँग्रेसला होत असून माविआशिवाय त्यांना 28 जागाही जिंकता येणार नाहीत, असे या सर्व्हेतून दिसून आलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये किरकोळ वाढ होईल पण बहुमताच्या जवळ जाणार नाहीत कारण उद्धव ठाकरे कोकणाबाहेर मजबूत नाहीत, असेही सर्व्हेत म्हटलं आहे.

शिवसेनेचं काय होईल?

एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेने पेक्षा मोठा पक्ष म्हणून उदयास येईल. तसेच भाजप आणि इतर अधिकअपक्ष मिळून 140 संख्याच्या आसपास असेल म्हणून भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता असल्याचे या सर्व्हेमध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्री म्हणून पंसती कोणाला?

राज्यात मुख्यमंत्री म्हणून पसंती कोणाला देणार असा प्रश्न या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला. त्यानंतर लोकांनी देवेंद्र फडणीसच यांना पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केल्याचे म्हटले आह. या सर्व्हेनुसारदेवेंद्र फडणवीस (35%), अशोक चव्हाण (21%), अजित पवार (14%), एकनाथ शिंदे (12%), उद्धव ठाकरे (9%), इतर (9%) अशी मते मिळाली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT