sushma andhare  Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sushma Andhare: '11 ते 13 मे दरम्यान फडणवीस यांना धक्का बसेल अन्...', सुषमा अंधारेंचा दावा

येत्या ११ ते १३ मे या कालावधीत महाराष्ट्रात काय घडेल ते सांगता येणार नाही असं अंधारे म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

राज्याच्या राजकारणात मोठे तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राज्यपालांकडे डिनर डिप्लोमसीला जाऊन आले. त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. या घडामोडीतून बरेच राजकीय संकेत येत आहेत. येत्या 11 ते 13 मे दरम्यान राज्यात काय होईल ते सांगता येणार नाही. डिनर डिप्लोमसीनंतर देवेंद्र फडणवीस यांना धक्का लागला तरी आश्चर्य वाटणार नाही, असं वक्तव्य ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीस पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. फडणवीसांच्या उठाठेवीमुळे पक्षाची इमेज खराब झाली आहे. एकनाथ शिंदेशी हातमिळवणी केल्यामुळे पक्षांची इमेज खराब झाली आहे, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटक निवडणुकीच्या एका रॅलीला बोलताना म्हंटलं की, मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतच असतो. कसा येतो हे तुम्हाला माहीत आहे, असं फडणवीस म्हणाले होते. या विधानावरून सुषमा अंधारे यांनी फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. फडणवीस पुन्हा येईन म्हंटलं होतं.

एकदा विरोधी पक्षनेते म्हणून आणि दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून आले. फडणवीस यांच्या विरोधात दिल्लीश्वरांचा गट इथे सक्रिय आहे. त्यामुळे फडणवीस पुढील काळात येतील पण विरोधी पक्षांचे नेते म्हणून, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विराट कोहलीवर पाच कोटींचा आरोप करणाऱ्या फलाहारी महाराजांनी मागितली माफी, म्हणाले...

Mumbai Protest Faceoff : "काय करायचं ते करा!"; शिवाजी पार्कवर पोलिसांनी अडवताच अमित ठाकरे भडकले, पोलिसांनी घेतलं ताब्यात

३५ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीच्या शरीराचा सौदा, ठाण्यात हायप्रोफाईल देहविक्रीचे रॅकेट उघड; महिलेला रंगेहाथ अटक

Daily Horoscope: आजचे राशिभविष्य : मेषसह या राशींना व्यवसायात यश; काहींना अचानक धनलाभाची शक्यता

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT