hsc-ssc esakal
महाराष्ट्र बातम्या

नव्या शैक्षणिक धोरणानुसार पुढील वर्षी 10वी-12वी बोर्डाची परीक्षा होणार की नाही?; शिक्षण मंडळानं दिलं स्पष्टीकरण

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रत्यक्षात लागू झाल्यानंतरही दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा होणारच आहे. पुढील वर्षी देखील दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा प्रचलित पद्धतीप्रमाणेच होणार आहे,’’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा होणार नसल्याचा गैरसमज विविध स्तरातून पसरविला जात आहे. यावर गोसावी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

देशभरात नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीची चर्चा सुरू आहे. या धोरणातील तरतुदीनुसार दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा रद्द होणार, शालेय शिक्षणात विविध टप्प्यावर परीक्षा होणार का, याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.

परिणामी विद्यार्थी-पालक एवढंच नव्हे तर शिक्षक-मुख्याध्यापक, शाळा प्रशासन यांचा गोंधळ उडाला असून संभ्रमावस्था आहे. या पार्श्वभूमीवर बारावीचा निकाल जाहीर करताना गोसावी यांनी दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांबाबत माहिती दिली.

गोसावी म्हणाले,‘‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केवळ त्या परीक्षा सत्र पद्धतीने घेण्याबाबत सुचविले आहे. त्यावर राज्य सरकार जो निर्णय घेईल, त्याप्रमाणे कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षा होणारच आहेत. त्याशिवाय इयत्ता पाचवी आणि आठवीच्याही परीक्षा घेण्याबाबत धोरणात म्हटले आहे.’’

त्यामुळे पुढील वर्षी देखील प्रचलित पद्धतीनेच दहावी आणि बारावीच्या परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याशिवाय नव्या शैक्षणिक धोरणानुसार राज्याचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही गोसावी यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT