new education policy
new education policy sakal
महाराष्ट्र

पुढच्या वर्षी ‘बी.एड’ चार वर्षांचेच! आता टक्केवारीला महत्त्व नाही, ‘क्रेडिट’वरच विद्यार्थ्यांचे प्रवेश

तात्या लांडगे

सोलापूर : आता बारावीनंतर प्रवेश घेताना विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक धोरणानुसारच, घ्यावा लागणार आहे. पहिल्यांदा बीए, बीकॉम, बीएस्सी या अभ्यासक्रमांना ते धोरण लागू असणार आहे. गुणापेक्षा आता क्रेडिटला महत्त्व असणार आहे. प्रत्येक सत्रावेळी (वर्षातून दोन सेमिस्टर) २० ते २२ क्रेडिट विद्यार्थ्यांना बंधनकारक आहेत. एखाद्याला ८०-९० टक्के गुण मिळाले, पण तेवढे क्रेडिट नसतील तर त्याला पुढील वर्गात जाता येणार नाही, असा बदल नवीन शैक्षणिक धोरणात करण्यात आला आहे.

राज्यातील १३ अकृषिक विद्यापीठांमध्ये २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे. बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांना नवीन बदलानुसारच प्रवेश घ्यावा लागणार आहे. पण, पहिल्या टप्प्यात कला, विज्ञान, वाणिज्य शाखेच्या शिक्षणात बदल असणार आहे.

अभियांत्रिकी, बी.एड व डी.एड अभ्यासक्रमात तूर्तास बदल केला जाणार नाही. दरम्यान, थेअरी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक १५ तासासाठी एक, तर प्रॅक्टिकलच्या ३० तासासाठी एक क्रेडिट विद्यार्थ्यांना मिळेल. प्रत्येक सेमिस्टरला २० ते २२ क्रेडिट असतील आणि वर्षाला ४० ते ४४ क्रेडिट विद्यार्थ्यांना घ्यावेच लागणार आहेत. त्यादृष्टिने प्राध्यापकांना विद्यार्थ्यांना थेअरी व प्रॅक्टिकल शिकवावे लागणार आहे. प्रात्यक्षिकाच्या ३० तासाला एक क्रेडिट मिळणार आहे. त्यासंबंधी एप्रिल २०२३मध्ये शासन निर्णय झाला आहे.

आता ४५ मिनिटांऐवजी ६० मिनिटांचे घड्याळी तास

सध्या विद्यापीठ व विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालयातील प्राध्यापकांना सध्या आठवड्याला २० तास घेणे बंधनकारक होते. पण, नवीन बदलानुसार प्राध्यापकांना १४ ते १६ घड्याळी तपास शिकवावे लागणार आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील बदलानुसार आता उच्च महाविद्यालयातील प्राध्यापकांना ४५ मिनिटांऐवजी घड्याळी ६० मिनिटांचा तास घ्यावा लागणार आहे. असोसिएट प्रोफेसर, नियमित प्राध्यापकांना दर आठवड्याला घड्याळी १४ तास तर सहायक प्राध्यापकांना १६ तास विद्यार्थ्यांना शिकवावे लागणार आहे. त्यावर महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठ व शिक्षण उपसंचालकांचा वॉच असणार आहे.

पुढच्या वर्षीपासून ‘बी.एड’ चार वर्षांचेच

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात ‘डी.एड’चा अंतर्भाव नाही. त्याऐवजी चार वर्षांचा इंटिग्रेटेड ‘बी.एड’ कोर्स असणार आहे. कोणत्याही वर्गाचा शिक्षक होण्यासाठी (प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा) विद्यार्थ्यांना बारावीनंतर ‘बी.एड’च करावे लागणार आहे. आगामी वर्षापासून राज्यातील सर्वच ‘बी.एड’ महाविद्यालयांना नवीन शैक्षणिक धोरणानुसार बदल करावा लागणार आहे. त्यासंदर्भात २ जूनला राज्यातील सर्व महाविद्यालयांची बैठक होणार आहे.

‘या’ बाबींवर मिळणार विद्यार्थ्यांना क्रेडिट

पदवीचे शिक्षण घेतानाचे अंतर्गत मूल्यमापन व विद्यापीठाच्या परीक्षेतील गुण, प्रात्यक्षिक कार्यातील सहभाग, मेजर व मायनर (इंडियन नॉलेज सिस्टिम, स्किल बेस्‌ड कोर्सेस, ऑप्शनला विषयातील गुण) विषयातील प्रगती, ग्रंथालयात जावून पुस्तकांचे वाचन, खेळातील सहभाग, प्रोजेक्टमधील मेहनत आणि शेवटी तो सर्व विषयात उत्तीर्ण झाला का, यावरून विद्यार्थ्यांचे क्रेडिट निश्चित होणार आहेत. पारंपारिक अभ्यासक्रमासोबतच प्रात्यक्षिक किंवा अनुभवातून विद्यार्थी किती शिकला, यावर क्रेडिट ठरणार आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

Mumbai Indians : भारी खेळतोय मात्र तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी 'अनलकी' ठरतोय? पाहा आकडेवारी काय सांगते

NCB अन् ATS ची मोठी कारवाई! गुजरातच्या सीमेवर 80 किलो ड्रग्ससह 14 पाकिस्तानी अटकेत

Lok Sabha Election : AAPने निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'ते' गाणे वापरण्यास निवडणूक आयोगाची मनाई; नेमकं काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT