Night Curfew Updates In Maharashtra, Covid Guideline sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारची नवी नियमावली; नाईट कर्फ्यूची घोषणा

सुशांत जाधव

मुंबई - कोरोनाच्या ( Covid New Guideline Issue In Maharashtra )वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा डोकेवर काढलेल्या कोरोनाचा सामना करण्यासाठी नवी नियमावली जाहीर करण्यात आलीये. यात स्विमिंग पूल, स्पा आणि जीम पुन्हा पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. याशिवाय पुन्हा एकदा नाईट कर्फ्यूची (Night Curfew) घोषणा करण्यात आली आहे. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत ही अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय सकाळी 5 ते रात्री 11 पर्यंत जमाव बंदीचे (Act 144 In Maharashtra) आदेश लागू करण्यात येणार आहेत. या काळाच पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरण्यावर निर्बंध असतील. 10 जानेवारी मध्यरात्रीपासून ही नवी नियमावली लागू होईल. (Night Curfew In Maharashtra New Guidelines issue To Face Covid 19)

कोरोनाची (Corona) वाढती रुग्ण संख्या पाहता राज्य सरकारने पुन्हा एकदा कठोर भूमिका घेतल्याचे दिसते. नव्या नियमांचे कठोर (Night Curfew Updates In Maharashtra) पालन करावे, असे आदेश देण्यात आले आहेत. मैदाने, उद्याने, पर्यटन स्थळ पूर्णपणे बंद राहतील. (Ground) सरकारी कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठकी घ्याव्या अशा सुचना करण्यात आल्या आहेत. दुसरीकडे खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेनं सुरु राहतील. ज्यांनी दोन डोस घेतले आहेत त्यांनाच कार्यालयात येऊन काम करता येईल. प्रवासादरम्यानही कोरोना नियमाचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधित लशीचे दोन (Corona Vaccination ) डोस घेतले असतील तरच तुम्हाला प्रवासाची मूभा दिली जाईल. ( 50 % Employee In Private Office )

रेस्टोरंट, हॉटेल, खासगी कार्यालये 50 टक्के क्षमतेने सुरु राहतील. क्रीडा क्षेत्रात नियोजित राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धात कोणताही व्यत्यय नसेल. पण संपूर्ण स्पर्धाही प्रेक्षकांशिवाय पार पाडावी लागेल. शाळा आणि महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद राहतील. लग्न कार्यक्रमात 50 टक्के लोकांनाच परवानगी असेल. (Maharashtra Government Issue New Guidelines)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT