Marathi Language Day sakal
महाराष्ट्र बातम्या

Marathi Language Day : आपुल्या घरात हाल सोसते मराठी...

काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार असे दागिने आणि अ ते ज्ञ या अक्षरांपासून बनत असलेली शब्दसंपत्ती हा जिचा ऐवज आहे ती आपली मराठी. जिचा बाळगावा तेवढा अभिमान कमीच आहे.

सकाळ वृत्तसेवा

- निलाक्षी काळे-सालके

काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार असे दागिने आणि अ ते ज्ञ या अक्षरांपासून बनत असलेली शब्दसंपत्ती हा जिचा ऐवज आहे ती आपली मराठी. जिचा बाळगावा तेवढा अभिमान कमीच आहे; पण जसा अभिमान बाळगला जातोय, तसेच ती जपलीही पाहिजे, म्हणजे पुढे पिढ्यानपिढ्या तिचा नावलौकिक कायम राहील.

आज मराठी भाषा गौरव दिवस, म्हणजे सर्रास मराठी माणसाच्या स्टेटसला तुम्हाला दिसतील त्या सुरेश भटांच्या या ओळी.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी...

जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी...

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी...

एवढ्या जगात माय मानतो मराठी...

पण खरंच आपण मराठी बोलतोय का, धन्य होण्यासाठी ती ऐकतोय का आणि तिला माय मानतोय का, हे प्रश्न स्वतःला विचारा, जी उत्तरे मिळतील ती खरंच मनाला पटतायत का ते पडताळा आणि मन खऱ्याची ग्वाही देत असेल तर बिनधास्त या ओळी स्टेटसला ठेवा. कारण माझ्या मते याच कवितेतील अजून काही ओळी आहेत, त्यातले शब्द आजच्या घडीला जास्त साजेसे वाटतात आणि ते म्हणजे,

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी...

आपुल्या घरात हाल सोसते मराठी...

ही आजची वस्तुस्थिती आहे. यावर प्रकर्षाने फक्त विचार न करता कृती प्रत्येक मराठी माणसाकडून अपेक्षित आहे.

काना, मात्रा, वेलांटी, उकार, अनुस्वार असे दागिने आणि अ ते ज्ञ या अक्षरांपासून बनत असलेली शब्दसंपत्ती हा जिचा ऐवज आहे ती आपली मराठी. जिचा बाळगावा तेवढा अभिमान कमीच आहे; पण जसा अभिमान बाळगला जातोय तसेच ती जपलीही पाहिजे म्हणजे पुढे पिढ्यानपिढ्या तिचा नावलौकिक कायम राहील.

‘जेथे पिकते तिथे विकत नाही’ असे म्हणतात. तसेच महाराष्ट्रात राहून ‘मराठी’ भाषेचे महत्त्व तितके जाणवत नाही! आई समोर असताना आईचे महत्त्व जाणवते का? आपण जेव्हा परप्रांतात काही काळासाठी जातो व सतत जेव्हा ती परप्रांतीय अनोळखी भाषा कानावर पडू लागते, तेव्हा आपण आपली मातृभाषा ऐकण्यासाठी कासावीस होतो. चुकून आपली भाषा बोलणारी, अनोळखी मंडळी दिसली तर ती माणसे अनोळखी असूनही खूप आपली वाटतात, हे भाषेचे अदृश्य धागे!

आपली मराठी भाषा समृद्ध व्हावी, तिचा प्रचार व प्रसार व्हावा, यासाठी आपणा सर्वांचीच भूमिका फार महत्त्वाची आहे. आजची आपली तरुण पिढी, त्यांची ‘सेलिब्रेट’ करण्याची वृत्ती, त्यांचे माहिती-तंत्रज्ञानावरील प्रेम, करमणूकप्रधान समाजरचना, दिन-विशेष असे बिंदू लक्षात घेता हा कार्यक्रम सहज शक्य आहे, असे मला वाटते. त्यात जेवढी कृतिशील भर घालता येईल तेवढे उत्तमच.

मराठीतील आद्यग्रंथ म्हणून ‘ज्ञानेश्वरी’चा उल्लेख होतो, त्यातही मातृभाषेबद्दल असणारा आदरभाव व्यक्त करताना ज्ञानेश्वर म्हणतात, ‘माझा मऱ्हाटीचि बोलु कवतुके परी अमृतातेही पैजेसी जिंके॥’ काळ बदलतोय, जिल्हा परिषदेच्या शाळेतसुद्धा शिक्षणाचा दर्जा सुधारतोय हे आश्वासक उदाहरण आहे. अनेक शिक्षणतज्ज्ञांनी सांगितले आहे की, मातृभाषेतून मूल लवकर शिकते.

कारण लहानपणापासून मातृभाषेमध्ये शिकल्याने आपले विचार व्यक्त करणे सोपे जाते. मातृभाषा ही ज्ञानभाषा झाली तर शिक्षण सुलभ होईल. याचा अर्थ असा नाही की, परकीय भाषा शिकू नये, परकीय भाषा जरूर शिकाव्यात, या भाषांचा आदर करावा; पण आपण आपल्या भाषेच्या समोर उभ्या ठाकलेल्या आव्हानांना अन्य भाषांचा जराही द्वेष मनात येऊ न देता प्रतिआव्हाने निर्माण नाही का करू शकणार? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे युग मानले जाते.

संपर्क-क्रांतीचे युग मानले जाते. अशा वेळी आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशाच छोट्या-छोट्या कृतींनी काहीच नाही का करू शकणार? भाषेच्या जाज्वल्य नाही तरी किमान मनस्वी अभिमानातून आपण किमान एखादी तरी कृती नाही का फुलवू शकणार? भाषेसाठी सर्वस्वाचा त्याग करणाऱ्या सक्रिय कार्यकर्त्यांना आपल्या परीने नाही का सहकार्य करू शकणार? मला वाटतं की हे फारसं अशक्य नाही. उलट या कृतींनी आपल्यालाच ‘अल्प योगदान’ दिल्याचे समाधान लाभू शकेल.

आज मराठी भाषा गौरव दिवस, वर्षातून एक दिवस सगळ्यांना शुभेच्छा देऊन तो दिवस साजरा करावा इतकी तोकडी भाषा आहे का आपली? नक्कीच नाही. सर्वप्रथम जसे आईला कधी विसरू नये, तसेच मातृभाषेलाही कधी विसरू नये. सर्व मराठी जनांना एवढेच सांगणे आहे, या स्पर्धात्मक युगात तुमची मुले इंग्रजी माध्यमात घाला; पण तेवढीच प्रवाहीपणा त्यांच्या मराठी बोलण्यातूनही जाणवू द्या. त्यांना मराठी भाषेचे महत्त्वही तेवढेच कळू द्या.

मराठी भाषाही त्यांना पटापटा लिहायला आणि घडाघडा बोलायला आलीच पाहिजे, नाहीतर जेव्हा आईला ते वृद्धाश्रमात ठेवतील, तेव्हा कोणालाही वाईट वाटता कामा नये, कारण लहानपणापासून आपण त्यांच्यासाठी मराठी भाषाही सध्या वृद्धाश्रमात ठेवल्यासारखी आहे.

सुंदरतेने नटली आहे आपली मराठी मातृभाषा,

भावी पिढीच्या मनी रुजावी हीच माझी अभिलाषा!

(लेखिका पुण्यातील मातृगंध संस्थेच्या संस्थापक आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICAI CA Final Result 2025 : आयसीएआय सीएचा परीक्षेचा निकाल जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कसा पाहू शकता?

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व महंत शिवाजी महाराज यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न

ठरलं! 'चला हवा येऊ द्या' या दिवशी सुरु होणार... विनोदाच्या गँगवारमधून यंदा भाऊ कदम गायब?

जगातील सर्वात महाग अश्रू! उंटाच्या अश्रूच्या एक थेंबात 26 सापांचे विष नष्ट करण्याची ताकद, संशोधनातून माहिती समोर...

Ashadhi Ekadashi 2025 : देवशयनी आषाढी एकादशी; विठ्ठल भक्तीचा महापर्व, एकात्मता भक्ती व समर्पणाचे प्रतीक

SCROLL FOR NEXT