political esakal
महाराष्ट्र बातम्या

पवार साहेब आता तरी संन्यास घ्या अन् गप्प घरी बसा - निलेश राणे

काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून?, निलेश राणेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून?, निलेश राणेंचा सवाल

एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहेत. याठिकाणी एसटी कर्मचारी आदोलकांनी चप्पल आणि दगडफेक सुरू केली आहे. दरम्यान या परिसरात कर्मचारी आक्रमक झाले असून कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याचे त्यांनी सांगितलं आहे. या संपूर्ण परिस्थितीला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. दरम्यान, आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. भाजपाचे निलेश राणे यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर सडकून टीका केली आहे.

भाजपाचे निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे. यात ते म्हणतात, काय उपयोग 50 वर्ष राजकारणात असून? सामान्य लोकं घरावर चप्पल आणि दगडी घेऊन आले. आयुष्यभर घाणेरडं राजकारण केल्यावर काय परिणाम होतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडिओ असं म्हणत त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. पवार साहेब आता तरी सन्यास घ्या, गप घरी बसा, असा सल्लाही निलेश राणे यांनी दिला आहे.

दरम्यान, एसटीच्या निलीनीकरणावर अद्याप कर्मचारी ठाम आहेत. कोर्टाचा निर्णय अन्यायकारी असल्याचं कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी कोणत्याही बैठका घडवून आणलेल्या नाहीत. पवार हे विलीनीकर न होण्यामागचे सूत्रधार असल्याचं काही कर्मचाऱ्यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारने १२४ एसटी कर्मचाऱ्यांचा खून केल्याची संतप्त भूमिका आंदोलनकर्त्या एसटी कर्मचाऱ्यांनी मांडली आहे. आता याप्रकरणामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील संघर्ष आणखी चिघळणार का अशी चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar Uranium Scare Explained: बिहारमधील आईच्या दुधात युरेनियम असल्याचा दावा अखेर खोटा ठरला? BARC च्या अहवालातून मोठा खुलासा

PF खातेदारांसाठी खुशखबर! कारण न देता मिळणार PFची संपूर्ण रक्कम? जाणून घ्या नवा नियम

India Squad Change: भारताच्या T20I संघात अचानक बदल! स्टार खेळाडू अचानक संघातून बाहेर, BCCI ने सांगितलं कारण

Influencers Fight: फ्री गिफ्ट्स च्या मोहाने रील्सवाल्यांचा खरा चेहरा समोर! इव्हेंटमध्ये प्रसिद्ध इन्फ्लुएन्सर्समध्ये राडा, व्हिडिओ व्हायरल

Pandharpur: विठ्ठल मुर्तीवरील लेपन प्रक्रियेला विरोध करणारी याचिका न्यायालयाने फेटाळली; 23 व 24 तारखेला प्रक्रिया होणार

SCROLL FOR NEXT