nilesh rane said to his activist in sindhudurg to explore BJP on village level sakal
महाराष्ट्र बातम्या

शिवसेना नेत्यांच्या उधळपट्टीवर राणे भडकले; दौऱ्याला जाताय की....

मध्यप्रदेशमधील शेतकरी दौऱ्‍यात पदाधिकारी, अधिकारी, सदस्यांसह नातेवाईकांचा भरणा असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

सकाळ डिजिटल टीम

रत्नागिरी : जिल्हा परिषद कृषी विभागाकडून आयोजित मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) शेतकरी (Farmer)दौऱ्‍यात पदाधिकारी, अधिकारी, सदस्यांसह नातेवाईकांचा भरणा असल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. दौऱ्‍यासाठी निकष कोणते काय असतात आणि त्याचे पालन झाले का, याबाबत चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)प्रचंड आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद दिवाळखोरीत असल्याने रस्ते, शाळांसाठी निधीची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेचे सदस्य गरिबांचा पैसा वापरुन सहली काढत आहेत, असा दावा निलेश राणे यांनी केला.

शेतकऱ्‍यांना नाविन्यपूर्ण उपक्रम तसेच शेतीसाठी प्रोत्साहन मिळावे, यासाठी कृषी विभागातर्फे दरवर्षी राज्याबाहेर किंवा परजिल्ह्यात एक शेतकरी अभ्यास दौरा काढला जातो. यासाठी शासनामार्फत तरतूदही केली जाते. गेली दोन वर्षे कोरोनामुळे हा अभ्यास दौरा काढला नव्हता. यावर्षी शेतकरी दौरा मध्य प्रदेशमध्ये काढला आहे. सोमवारी (ता. ६) हे सर्वजणं मध्यप्रदेशला रवाना झाले असून गुरूवारी (ता. ९) हा दौरा समाप्त होणार आहे. यात एकूण २७ जणं सहभागी असल्याची माहिती आहे. यामध्ये शेतकऱ्‍यांबरोबरच पदाधिकारी, सदस्य, पदाधिकाऱ्‍यांचे नातेवाईक यांचीच संख्या अधिक आहे.

दौरा काढण्यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या आवश्यक त्या गोष्टींची पूर्तता केली आहे. मुंबईतून विमानाने हे सर्वजण मध्यप्रदेशला गेल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. विमानातील तसेच विमानतळाबाहेरील फोटो व्हायरल झाल्यामुळे चर्चेला तोंड फुटले आहे. या दौऱ्यासाठी लाखोंचा निधी खर्ची टाकल्याने शेतकऱ्यांच्या सहलीच्या नावाखाली उधळपट्टी सुरू असल्याची चर्चा असून याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

शिवराजसिंग चव्हाण मंत्रीमंडळाने मध्यप्रदेशात शेतीमध्ये खुप मोठी क्रांती केली आहे. ते पाहण्यासाठी दौऱ्‍याचे नियोजन केले असते तर निश्‍चितच त्याचे स्वागत केले असते. परंतु सोशल मिडीयावर व्हायरले झालेले फोटो आणि वृत्त पाहता सगे सायरे यांना घेऊन दौरा केल्याचे दिसत आहे. हा एकप्रकारे जनतेच्या पैशाचा अपव्यय ठरेल.

- अ‍ॅड. दीपक पटवर्धन, जिल्हाध्यक्ष, भाजप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT