महाराष्ट्र बातम्या

...तर समोर येऊन दोन हात करा; निलेश राणेंचा इशारा

स्नेहल कदम

वसेना भाजपा असा वाद शिगेला पोहचणार का? अशी चर्चा सुरु आहे.

चिपळूण - केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी काल महाड येथे बोलत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी आक्षेपार्ह वक्यव्य केल्याने राज्यसरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. मुख्यमंत्र्यांवर (cm uddhav thackeray) टीका करताना राणे यांची जीभ घसरली आहे. परंतु नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर कोकणासह राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे शिवसेना भाजपा (shivsena-Bjp) असा वाद शिगेला पोहचणार का? अशी चर्चा सुरु आहे. दरम्यान भाजपाचे निलेश राणे (nilesh rane) यांनीही ट्वीट करुन शिवसेनेवर टीका केली आहे.

ते म्हणतात, कुठेतरी बॅनर लावा आणि मीडियावर हात छाटण्याची वार्ता करून शिवसेनेला वाटत असेल, की आम्हाला फरक पडतो. तर त्यानी लक्षात घ्यावं, आम्हाला काडीभर फरक पडत नाही. जर तुम्ही खरे असाल तर समोर येऊन आणि दोन हात करा, तुम्हाला तुमची क्षमता दाखवून देऊ, असा घाणाघात त्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे मुंबईत राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये राडा होण्याची दाट शक्यता आहे. नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे (nitesh rane) यांनी तसे ट्विट केले आहे.

दरम्यान, आज या यात्रेसाठी ते कोकणात दाखल होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणात आज दिवसभर त्यांच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर त्यांनी जनआशीर्वाद यात्रेच्या कार्यक्रमात कोणताही बदल केलेला नाही. परंतु नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर कोकणासह राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. आता कोकणातील जनयात्रेवर या सगळ्याचे काय पडसाद उमटणार ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Attack Video: पत्नीवर पिटबुलचा हल्ला, वाचवायला गेलेल्या पतीलाही चावा; दीड मिनिटात २६ वेळा चावले, हातासह पायावर सर्जरीची वेळ

Dagdusheth Ganpati Temple: ‘दगडूशेठ गणपती ट्रस्ट’ला फरासखाना ठाण्याची जागा मिळणार, पुणे पोलिसांकडून गृह विभागाकडे प्रस्ताव सादर

'वचन दिले तू मला' मालिकेतून अभिनेत्याची एक्झिट; मिलिंद गवळींनी शेअर केली खास पोस्ट ,म्हणाले- खूप त्रास

Shravan Calendar 2026: कॅलेंडर कशाला उघडताय? श्रावणातल्या सगळ्या सणांची यादी इथेच वाचा

Latest Marathi News Live Update : २०१८ च्या भागामध्ये कोणताही महत्त्वपूर्ण बदल झालेला नाही - सरन्यायाधीश

SCROLL FOR NEXT