nilesh rane,supriya sule, sanjay raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्रात 'दारू' का स्वस्त झाली ते आता समजलं : निलेश राणे

सकाळ डिजिटल टीम

दारू वरची एक्साईज ड्युटी पन्नास टक्कें कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. यांना महाराष्ट्राचं काही घेण देण नाही असा निशाणा शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांच्यावर भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane)यांनी ट्विट करत लगावला. खासदार संजय राऊत (Sanjay Raut)यांच्या मुलीचं लग्न सोमवारी आहे. लग्नाआधीचे विधी आणि संगीत कार्यक्रम पवईतील रेनेसा या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये होते. याठिकाणी सुप्रिया सुळे आणि संजय राऊत यांनी संगीत कार्यक्रमात डान्सचा करत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला. यावरून राणे यांनी टिका केली आहे.

पूर्वशी आणि मल्हार यांच्या लग्नसोहळ्यानिमित्त आयोजित संगीत कार्यक्रमात दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती. यावेळी खासदार सुप्रिया सुळे याही त्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. त्याचे फोटो आणि भन्नाट डान्सचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला.

दरम्यान, निलेश राणे यांनी यावर टिका केली आहे. ते म्हणाले, दोन वर्षात महाराष्ट्राचं वाटोळं करणारं सरकार कसं जनतेच्या छातीवर नाचतं याचं उदाहरण हा व्हिडिओ आहे. या नेत्यांना सर्वसामान्य नागरीकांचे काही देणे घेणे नाही . दारू वरची एक्साईज ड्युटी 50% कमी करण्याचं कारण आत्ता समजलं. शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आणि ठाकरे सरकारचे प्रमुख नेते डान्स करतायत. असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: मालक समजणाऱ्यांना हटवा: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गणेश नाईकांवर टीका, गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही !

Latest Marathi News Live Update : भाजपच्या नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर यांनी घेतला पदभार

BMC Election: महापालिकेच्या रणांगणात जुने खेळाडू पुन्हा मैदानात! अनुभवाला की नव्या चेहर्‍यांना संधी?

Mumbai Municipal Election : निवडणूक प्रचारात कार्यकर्त्यांची खाण्यापिण्याची ऐश; कार्यकर्त्यांच्या पोटाचा मार्ग 'पक्षाच्या' तिजोरीतून!

Baramati News : बारामतीच्या उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी? 16 जानेवारीला होणार निवड

SCROLL FOR NEXT