nilesh rane, supriya sule Esakal
महाराष्ट्र बातम्या

हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले, तर काहींना त्रास होणारच: राणे

निलेश राणेंचा सुप्रिया सुळेंवर थेट निशाणा

सकाळ डिजिटल टीम

भारतीय संविधान दिनानिमित्ताने मुंबई (Mumbai)राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाने प्रदेश कार्यालयात संविधान गौरव दिन विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सरकारचा निषेध करत विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला. दरम्यान केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा अस म्हणत सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. यावर आज भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आपण कायदे बनवायला आणि बदलायला खासदार झाले आहात का? असा सवाल उपस्थित करत उपरोधक टिका केली आहे.

आपण कायदे बनवायला आणि बदलायला खासदार झाले आहात, आपण इतके वर्ष जे बदल सुचवले त्याने संविधान बदललं असं म्हणायचं का?

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे

मोदी सरकार संविधान बदलू पाहत असून, भाजपला जोरदार विरोध करा. संविधान जात, धर्म किंवा प्रांत नाही. तो एक ग्रंथरूपातला कष्टपूर्वक घडवलेला मार्गदर्शक आहे. पण केंद्रातील सत्ताधारी हे संविधान बदलू पाहत आहेत. त्यांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रयत्न याच दिशेने सुरू आहेत. आज आपली जी काही ओळख आहे ती संविधानामुळे आहे. त्यामुळे संविधानात जर कुणी बदल करत असेल तर त्याचा कडाडून विरोध करा. या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ज्या संविधानाने ताकद दिली त्या संविधानाचा सन्मान आपल्याला टिकवायचा आहे. या संविधानाने ही ताकद आपल्याला दिली म्हणूनच संयुक्त किसान मोर्चातल्या शेतकऱ्यांचा लढा यशस्वी झाला आणि केंद्रसरकारला कृषी कायदे मागे घ्यावे लागले.

यावर निलेश राणे यांनी ट्विट करत टिका केली आहे. ते म्हणाले, खासदार सुळे विसरल्या 'संविधान बदलत अस्त' ज्याला अमेंडमेंट म्हणतात. आपण कायदे बनवायला आणि बदलायला खासदार झाले आहात, आपण इतके वर्ष जे बदल सुचवले त्याने संविधान बदललं असं म्हणायचं का? हिंदूंच्या हिताचे निर्णय घेतले तर काहींना त्रास होणारच पण बोलायचं म्हणून काही बोलू नका. अशी टिका निलेश राणे यांनी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water Storage : पुणेकरांची पाण्याची चिंता मिटणार! पानशेत धरण 69 टक्के भरले; खडकवासला साखळीत 'इतके' टीएमसी पाणी जमा, पाहा पाण्याची स्थिती

Bullock Cart Racing : 'किंग' ठरला सांगलीचा खिलार! बैलगाडी शर्यतींवरील बंदी उठताच खोंडांची तुफान क्रेझ; लाख-दीड लाखाचा खोंड विकला जातोय 8 लाखांत

विशेष : इंजिनिअरिंग ऑप्शन फॉर्म कसा भरावा?

Pune Red Alert : पुणे जिल्ह्याला आज 'रेड अलर्ट'; पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Farm Loan Waiver : अजितदादांच्या जयंतीचा मुहूर्त! 56 लाख शेतकऱ्यांना 37 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी; कर्जमुक्तीची पहिली यादी आज होणार प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT