nilesh rane,hemant nagrale sakal
महाराष्ट्र बातम्या

निलेश राणेंच्या सडेतोड टिकेला मुंबई पोलिस आयुक्तांचा खुलासा

सकाळ डिजिटल टीम

मुंबई शहर पोलीस (Mumbai Police) दलातील कार्यरत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिवाळी सणानिमित्त महाविकास आघाडीडून ७५० रुपये बोनस देण्यात आला आहे. यासाठी अनेक अटी लावण्यात आल्या आहेत. ठाकरे सरकारने मुंबई पोलिसांना अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये दिवाळी बोनस जास्तच दिला आहे, पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे अशी खरमरीत टिका निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ठाकरे सरकारवर केली आहे. राणेंनी ट्विट करुन हल्लाबाेल केला.

पुढे ते म्हणाले, ठाकरे सरकार कडून मुंबई पोलिसांना दिवाळी बोनस केवळ ७५० रुपये देण्यात आला आहे, अपेक्षेपेक्षा पाचशे रुपये जास्तच दिले म्हणावं लागेल कारण ठाकरे सरकार आहे. बोलण्यासारखं आता राहिलं नाही, आता पोलिसांनीच त्यांच्या बंदुकीचा वापर करून ठाकरे सरकारला घोडा लावला पाहिजे त्याशिवाय सुधारणार नाहीत हे लोकं असे सुनावले.

मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांचा खुलासा

मुंबई शहर पोलीस दलात दिवाळी सणानिमित्त शुभेच्छापत्र, दिवाळी फराळ, मिठाई, आणि छोटीसी भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. गेले दोन वर्ष कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे शुभेच्छा पत्र, मिठाई आणि भेटवस्तू वितरित करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे भेटवस्तूंऐवजी सदर रकमेचे थेट साहित्य खरेदी करण्याचा पर्याय सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना देण्याचा निर्णय यावर्षी घेण्यात आला आहे. यंदा मुंबईत 6 पोलीस कॅन्टीनमध्ये दिवाळीसाठी आवश्यक साहित्यावर 750 रुपये सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली. निलेश राणेंच्या सडेतोड टिकेला मुंबई आयुक्तांनी खुलासा केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT