politics esakal
महाराष्ट्र बातम्या

'नका करू तोंडाची वाफ, नाहीतर...'; राणेंचा महाविकास आघाडीवर घणाघात

यावरून विरोधकांकडून हे सरकार गांजा प्रकरणामध्ये सहभागी आहे.

सकाळ डिजिटल टीम

यावरून विरोधकांकडून हे सरकार गांजा प्रकरणामध्ये सहभागी आहे. त्यांचे संबंध गांजा विकणाऱ्यांशी आहे, अशी वक्तव्य आणि आरोप करत आहेत.

राजकीय वर्तुळात दररोज अनेक नव्या घडामोडी घडत असतात. याच घटनांना अनुसरुन विरोधक आणि सत्ताधारी पक्षातील दिग्गज नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. आजही एका कार्टूनवरून भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीकास्त्र सोडले आहे. यामध्ये त्यांनी एकच वाक्य लिहले आहे. ते म्हणतात, नका करू तोंडाची वाफ... होईल तुमच्याच जीवाला ताप... असा खोचक चिमटा त्यांनी काढला आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्वीटमध्ये एक कार्टून दिसत आहे. जलयुक्त शिवार अभियान घोटाळाच्या या कार्टूनमध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, कॉंग्रेसचे नाना पटोले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस अशी दिग्गज नेतेमंडळी दिसून येत आहे. या योजनेचा बॉम्ब न फुटता फक्त त्याची हवा निघून गेली असल्याने याचे हसे होत आहे, असे दाखवले गेले आहे.

सध्या सुरु असलेल्या आर्यन खान क्रुझ ड्रग प्रकरण आणि त्याला लागून सुरु असलेले समीर वानखडे या दोन मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकरामधील कोणत्याही नेत्याने कोणतीच प्रतिक्रीया दिलेली नाही. यावरून विरोधकांकडून हे सरकार गांजा प्रकरणामध्ये सहभागी आहे. त्यांचे संबंध गांजा विकणाऱ्यांशी आहे, अशी वक्तव्य आणि आरोप करत आहेत. आज समीर वानखडे या प्रकरणाविषयी पत्नी क्रांती रेडेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक भावनिक पत्र लिहले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

१३ वर्षांपासून शारीरिक संबंध नाही, विकी डोनर बनवून ठेवलंय... टीव्हीच्या श्रीकृष्णाने पत्नीवर केलेले गंभीर आरोप

Ladki Bahin eKYC: लाडक्या बहिणींना दिलासा की तांत्रिक गोंधळ? लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी सुविधा सुरूच, पण अंतिम तारीख काय?

India Cricket Matches in 2026: टी२० वर्ल्ड कप ते इंग्लंड, न्यूझीलंडचे दौरे... भारतीय संघाचे २०२६ वर्षात कसे आहे संपूर्ण वेळापत्रक?

SCROLL FOR NEXT