Nilesh Rane on Sindhudurg Cooperative Bank Election Result sakal
महाराष्ट्र बातम्या

'अख्खी चिवसेना ओकत होती पण...', निकालानंतर निलेश राणेंचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेवर (Sindhudurg Cooperative Bank Election Result) भाजपचा (BJP) झेंडा फडकला असून १९ पैकी १० जागा भाजपने जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फक्त पाच जागा मिळविता आल्या. त्यामुळे राणे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली. त्यानंतर आता निलेश राणे (Nilesh Rane) यांनी शिवसेनेसह महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे.

''अख्खी चिवसेना ओकत होती. पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला. कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल, असं वर्गणी चोरांना वाटत होतं. पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो'', अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या 19 पैकी 10 जागा भाजपने जिंकल्या आहेत. तर 5 जागा महाविकास आघाडीला मिळाल्या आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत पराभूत झाले. तसेच भाजपचे विठ्ठल देसाई विजयी झाले. पण, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पराभव झाल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून सिंधुदुर्गात वातावरण तापलं होतं. संतोष परब हल्लाप्रकरणावरून शिवसेनेने नितेश राणेंचा घेरण्याचा प्रयत्न देखील केला. नितेश राणेंना अटक करण्याची मागणी देखील शिवसेनेकडून करण्यात आली होती. सध्या नितेश राणे कुठे आहेत? हे कोणालाच माहिती नाही. सिंधुदुर्ग पोलिसांनी नितेश राणेंना शोधण्यासाठी गोव्यापासून मुंबईपर्यंत फिल्डींग लावली आहे. मात्र, राणे अजूनही पोलिसांना सापडले नाहीत. नितेश राणे यांनी न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा जामीन न्यायालयानं फेटाळून लावला. त्यामुळे आता त्यांना अटक होतेय का? हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

IMD Weather Alert : पुढील 20 तासांत 25 राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; वाऱ्याचा वेग ताशी 75 किमीपर्यंत जाण्याची शक्यता, महाराष्ट्रातील विदर्भातही पावसाचा जोर

Rohit Sharma Dance: रोहितने माहोल बनवला... Treding गाण्यावर डान्सिंग मुव्ह; मित्रालाही शिकवले... Video Viral

'येतेच आता मी नांदायला'! स्टार प्रवाहनंतर येतेय झी मराठीची नवी मालिका; मुख्य अभिनेत्रीचं नाव ऐकूनच लागेल ठसका

SCROLL FOR NEXT