MP Vinayak Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

निलेश राणे यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच; विनायक राऊत

न्यायालयाचं पावित्र्य राखले पाहीजे ; विनायक राऊत

सकाळ डिजिटल टीम

सिंधुदुर्ग : शिवसेना (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब हल्ला प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आवारात हुज्जत घातल्या प्रकरणी भाजपचे (BJP) निलेश राणे (Nilesh Rane) यांच्यासह भाजपच्या अन्य पाच जणांवर ओरोस पोलिस स्थानकात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी शिवसेना आमदार वैभव नाईक (Shivsena MLA Vaibhhav Naik)यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकांना पत्र पाठवले होते. निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

विनायक राऊत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाच्या आवारात स्वाभिमान पक्षाच्या लोकांकडून धुडगूस घातला गेला ते योग्य नाही. न्यायालयाचं पावित्र्य राखले पाहीजे. त्यावर पोलिसांनी केलेली कारवाई योग्यच आहे. अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.

दरम्यान, मुंबईमध्ये पेगॅसस प्रकरणाच्या मुद्यावरून भाजप-काँग्रेसमध्ये राडा झाला आहे. याविषयी बोलताना राऊत म्हणाले, मुंबई महापालिका पुर्नरचना संदर्भात आक्षेप घ्यायचा असेल तर घ्यावा. कामकाज आटोपून घेणे हे सरकारचं धोरण आहे.पेगॅससवर चर्चा झाली पाहिजे. राज्य सरकारच्या वाईन निर्णयावर राज्यभर गोंधळ सुरु असताना खासदार जलील यांच्यावर निशाणा साधत राऊत म्हणाले, वाईनच्या माध्यमातून नवे मार्केट उपलब्ध होत असेल तर तो निर्णय योग्य आहे. खासदार जलील यांना कांगावा करणं माहिती आहे असेही ते म्हणाले.

न्यायालयाच्या आवारात का झाला गोंधळ

सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयानं नितेश राणेंचा जामीन फेटाळला. तसेच संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंना अटक करण्यासाठी पोलिसांनी आधीच फिल्डींग लावली होती. न्यायालयानं जामीन फेटाळताच पोलिसांनी राणेंच्या गाडीला घेराव घातला. पण, तुम्हाला गाडी थांबवण्याचे आदेश कोणी दिले, असा सवाल करत निलेश राणे चांगलेच आक्रमक झाले होते. तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत आहात. आधी आदेश दाखवा आणि गाडी थांबवा, असं निलेश राणे म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : मुंबई इंडियन्सच्या सलग चार पराभवामागची ५ कारणं! हार्दिक पांड्या अजूनही नाही सुधरला, तर...

IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल

Maharashtra सरकारचा धडाकेबाज निर्णय! 7व्या वेतन वेतनगटानुसार शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार लक्झरी घरं, जाणून घ्या संपूर्ण नियम

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात नवीन पे स्केलचा प्रस्ताव, कर्मचाऱ्यांच्या पगारात स्तरानुसार होणार तब्बल 'इतकी' वाढ,पाहा यादी

MI vs PBKS Live: क्विंटन डी कॉकने मोडला रोहितचा विक्रम, ३ धावांनी हुकला १८ वर्षांपूर्वीचा पराक्रम! पण, परदेशी खेळाडू म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT