Nilesh Rane on 109 ST employees protest on sharad pawar residence
Nilesh Rane on 109 ST employees protest on sharad pawar residence  esakal
महाराष्ट्र

"...मग ही शिक्षा कशासाठी?"; 109 एसटी कर्मचाऱ्यांसाठी निलेश राणेंचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) रोजी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिव्हर ओक या निवासस्थानावर हल्ला चढवला होता. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली होती तर आज कोर्टाने 13 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल झाला आहे त्यांना सेवेत घेता येणार नसल्याची माहिती दिली आहे.

दरम्यान भाजपचे नेते यांनी निलेश राणे यांनी "हे 109 कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी??" असा सवाल केला आहे. या १०९ एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घेता येणार नाही असे सांगितल्यानंतर निलेश राणे यांनी हे कर्मचारी कुठे जातील असा सवाल करत शरद पवार यांच्यावर देखील हल्ला चढवला आहे.

Nilesh Rane Tweet

निलेश राणे यांनी ट्विट केलं आहे की, "हे 109 कामगार मराठी नाही?? कुठेही पवारांच्या घराचं नुकसान झालेलं नाही मग ही शिक्षा कशासाठी?? किती दिवस पवारांची भांडी घासणार, भानगडी सोडल्या तर काय मिळालं पवारांमुळे महाराष्ट्राला याचा कधी तरी विचार करा आणि ते 109 कामगार कुठे जातील याचाही विचार करा." दरम्यान आज परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी महामंडळ यांच्यात आज तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत काय निर्णय घेतला जाईल याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT