Nilesh Rane Reaction FIR Sharad Pawar D Gang Controversial Statement  eSakal
महाराष्ट्र बातम्या

''...तरी पवारसाहेब'', गुन्हा दाखल झाल्यानंतर निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे दोन सुपूत्र हे आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. यापूर्वी नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर त्यांच्या दोन्ही पुत्रांवर गुन्हा दाखल झाला होता. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करणे त्यांना भोवलं आहे. राणे बंधूंवर पुन्हा एक गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर निलेश राणे (Nilesh Rane) यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

''माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी म्हणतच राहणार. शरद पवार हे दाऊदची व्यक्ती आहे याबाबत मला संशय आणि राहणार'', असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे. गुन्हा दाखल झाल्यावरही ते त्यांच्या वक्तव्यावर ठाम असल्याचे दिसतात.

नेमकं काय आहे प्रकरण? -

निलेश राणे आणि नितेश राणे यांनी जाणीपूर्वक हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करून दंगल घडेल असं वक्तव्य केलं. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं वक्तव्य करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण केला, अशी तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी गंभीर दखल घेत शनिवारी रात्री उशिरा राणे बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितेश राणेंचं वक्तव्य नेमकं काय? -

अनिल देशमुख यांना अटक झाल्यानंतर त्यांचा राजीनामा घेण्यात आला. कारण ते मराठा समाजाचे होते. पण, नवाब मलिक मुस्लीम समाजातून येतात. त्यामुळे त्यांचा राजीनामा घेतला जात नाही. हे सर्व दाऊदच्या सांगण्यावरून होत असल्याचं मोठं वक्तव्य नितेश राणे यांनी आझाद मैदानावर केलं होतं. तसेच शरद पवार यांचे दाऊदसोबत संबंध आहेत. त्यामुळे नवाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही, असा आरोपही नितेश राणे यांनी केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT