महाराष्ट्र बातम्या

वडिलांच्या अटकेवर निलोफर मलिकांची पहिली प्रतिक्रिया; 'डी-कंपनीशी प्रत्येकाचाच...'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीने (ED) छापा टाकला आहे. यानंतर त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात बोलावण्यात आले. सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर मलिकांना अटक करण्यात आली आहे. ईडी (ED) च्या या कारवाईनंतर नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक यांनी माध्यमांना पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली. (Nawab malik reaction after got arrested by ED)

नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक या म्हणाल्या की, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून आम्ही हे ऐकतोय की ईडी येणार आहे. तसेच माझ्या वडीलांनी आम्हाला दक्षता घेण्यास सांगितलं होतं. मात्र, आम्ही सगळं काही योग्य पद्धतीनेच केलंय. माझे वडील कसलीही भीड न बाळगता बोलताता त्यामुळेच ईडी आणि एनसीबी आमच्या मागे लागली आहे.

मला अशी खात्री आहे की, माझे वडील नक्कीच बाहेर येतील. ही न्यायालयीन लढाई असून आम्ही ती जरुर लढू. प्रत्येक मुस्लीम जो सार्वजनिक जीवनात कार्य करतो आहे तो डी-कंपनीशी संबंधित असल्याचा नेहमीच दावा केला जातो. अशाप्रकारचा दावा करणं अर्थातच आम्हा मुस्लीमांवरील अन्याय आहे.

अटकेनंतर ईडीच्या गाडीत बसताना नवाब मलिक (Nawab Malik) म्हणाले, “अटक करण्यात आली आहे पण आम्ही घाबरलेलो नाही. आम्ही लढणार आणि जिंकणार”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यात पावसाचा अंदाज; मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाला पोषक हवामान

Maharashtra Board: विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Social Media Ban: तेरा वर्षांखालील मुलांना सोशल मीडिया बंद; युरोपीय आयोगाने ‘इयू किड्स ॲक्ट’ स्वीकारला

Maharashtra drought-like situation: परतीचा पाऊस जोरदार पडून बळीराजाला दिलासा मिळू दे; महसूलमंत्री चंद्रकांत बावनकुळे यांचे गणरायाला साकडे

Champakali Recipe: गणेशोत्सवात बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवा जिभेवर विरघळणारी खुसखुशीत 'चंपाकळी'!

SCROLL FOR NEXT