सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव्वल Esakal
महाराष्ट्र बातम्या

सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव्वल

सात वर्षांत तेराशे पोलिस निघाले लाचखोर! लाचखोरीत नऊ जिल्हे अव्वल

तात्या लांडगे

साडेसहा वर्षांत राज्यातील एक हजार 314 पोलिस अधिकारी व कर्मचारी तर महसूलमधील एक हजार 419 जणांवर लाचलुचपतची कारवाई झाली आहे.

सोलापूर : "सद्‍रक्षणाय, खलनिग्रहणाय' या ब्रीदवाक्‍यानुसार सर्वसामान्य जनतेला सुरक्षित ठेवून "खल' वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांकडून (Maharashtra Police) अपेक्षित आहे. मात्र, साडेसहा वर्षांत राज्यातील एक हजार 314 पोलिस अधिकारी व कर्मचारी तर महसूलमधील (Department of Revenue) एक हजार 419 जणांवर लाचलुचपतची कारवाई झाली आहे. फडणवीस सरकारच्या (फडणवीस सरकार) काळात महसूलमधील एक हजार 152 तर पोलिस दलातील एक हजार 64 अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi government) (जानेवारी 2020 ते 31 जुलै 2021 पर्यंत) महसूलमधील 267 तर पोलिस दलातील 250 जण लाच प्रकरणात अडकले आहेत.

राज्य सरकारच्या सर्वाधिक योजनांची अंमलबजावणी महसूल यंत्रणेमार्फत केली जाते. तर सामाजिक शांतता व सुव्यवस्था राखण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे. दोन्ही विभाग राज्याच्या अर्थकारणात व समाजकारणात महत्त्वपूर्ण आहेत. तरीही, लाच प्रकरणात सर्वाधिक अधिकारी, कर्मचारी या विभागांमधीलच आहेत. मूठभर भ्रष्ट अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे हे विभाग बदनाम झाले आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, जळगाव, नगर, औरंगाबाद, उस्मानाबाद, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांमध्ये लाच प्रकरणातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. मागील साडेसहा वर्षांत राज्यभरात लाचेचे पाच हजार 757 गुन्हे दाखल झाले आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे बऱ्याच अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बडतर्फीचे व निलंबनाचे प्रस्ताव विभाग प्रमुखांकडे पडूनच आहेत. शासकीय योजना असो वा अन्य कोणत्याही कामांसाठी लाच घेण्याची प्रवृत्ती प्रशासकीय व्यवस्थेत रुजत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. "भ्रष्ट्राचारमुक्‍त भारत अथवा महाराष्ट्र' यादृष्टीने कधीच ठोस पावले उचलली गेली नाहीत. शासकीय योजनांचा लाभ ऑनलाइन करूनही लाचेची प्रकरणे कमी झालेली नाहीत. त्यावर शासनाकडून ठोस उपाययोजनांची गरज व्यक्‍त होत आहे.

2015 पासून लाच प्रकरणांची स्थिती

  • महसूल विभाग : 1,419

  • पोलिस विभाग : 1,314

  • एकूण गुन्हे : 5,757

  • अंदाजित रक्‍कम : 89.96 कोटी

लाच घेणे व देणेही गुन्हाच आहे. अधिकृत शासकीय व खासगी काम तत्काळ होत असतानाही काही अधिकारी, कर्मचारी लाच मागतात. लाच प्रकरणात आता तक्रारदार समोर येत असल्याने या प्रकाराला आळा बसेल, असा विश्‍वास आहे. अधिकृत काम करताना कोणीही लाच मागितल्यास थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, निश्‍चितपणे संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाईल.

- संजीव पाटील, उपअधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT