Cm Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

NIT Land Scam : मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंवर झालेले गंभीर आरोप

अधिवेशनाचा आजचा दिवस शिंदेंवरच्या याच घोटाळ्याच्या आरोपावरुन गाजत होता.

सकाळ डिजिटल टीम

नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर न्यास घोटाळ्याबद्दल गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसंच त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. आणखी कोणकोणते आरोप मुख्यमंत्री शिंदेंवर आहेत?

१. ५० खोके

मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदेंवर झालेला सगळ्यात मोठा आरोप तर अगदी संपूर्ण राज्याला आता माहित आहे. तो म्हणजे ५० खोके. शिवसेनेमध्ये बंड झालं आणि एकनाथ शिंदेंसह मोठ्या संख्येने आमदार पक्षापासून वेगळे झाले. त्यांनी स्वतःचा गटही स्थापन केला. त्यानंतर काही दिवसांतच भाजपासोबत युती करत सत्ताही स्थापन केली.

या सगळ्यासाठी एकनाथ शिंदेंसह सर्वच आमदारांना ५० कोटी रुपये लाच देण्यात आली, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात आला. त्यावर अनेकदा या सर्वच नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं, टोलेबाजी करत विषय टाळला, मात्र सत्तास्थापनेच्या जवळपास सहा महिन्यांनंतरही त्यांच्यावर सातत्याने हे आरोप केले जात आहेत.

२. साखर कारखान्यांवर विशेष कृपा

राज्यात ऊस आणि गाळप हंगामात राज्य सरकारकडून त्यांच्या मर्जीतल्या लोकांच्या कारखान्यांना मदत केली जात असल्याचाही आरोप एकनाथ शिंदेंसह त्यांच्या मंत्रिमंडळावर करण्यात येत आहे. यंदाच्या हंगामात शासकीय भागभांडवलाचा पहिला लाभार्थी राज्याचे उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कारखाना ठरला आहे. तर फडणवीसांचे निकटवर्तीय असलेले भाजपा आमदार अभिमन्यू पवार यांच्या कारखान्यालाही ३४ कोटी रुपयांचं भागभांडवल मंजूर झालं आहे.

३. न्यासा भूखंड घोटाळा

एप्रिल २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी ५ एकर सरकारी जमीन १६ बिल्डर्सना कमी दरात भाडेतत्वावर दिली होती. या जमिनीवर झोपडपट्टी वासियांसाठी घरं बांधायची होती, पण ती खासगी विकासकांना देण्यात आली, असा आरोप शिंदे यांच्यावर करण्यात आला आहे. अधिवेशनाचा आजचा दिवस याच मुद्दयावरुन गाजत होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल! ४ मोठी कलमे अन् अनेक मागण्या, तक्रारीत काय लिहिलंय?

'आमचं मोकळं, शांत आयुष्य उद्ध्वस्त झालं..'; दोन मुलींसह घनदाट जंगलात राहणाऱ्या रशियन महिलेनं काय सांगितलं? ती भारतात का आली होती?

Pune Riverfront Development Project: पुण्यातील नदीकाठ सुधार प्रकल्पसाठी १३०० झाडांच्या कत्तली, १८०० झाडं स्थलांतरीत! हायकोर्टानं घेतली गंभीर दखल

Water Supply Close : पुणेकरांनो सावधान! मध्य पुण्यासह दक्षिण व पश्चिम भागाचा पाणीपुरवठा राहणार बंद

झीचा दर्जा इतका घसरला? 'लक्ष्मी निवास'चा 'तो' एपिसोड पाहून अभिनेत्री संतापली; म्हणाली, 'गरज नसताना ते सीन...'

SCROLL FOR NEXT