Vaibhav Naik Esakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंच्या अटकेसाठी शिवसेना आक्रमक; कणकवलीत पोलीस पथक दाखल

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत पोलीस स्टेशन गाठले

सकाळ डिजिटल टीम

कणकवली : आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या अटकेच्या मागणीसाठी शिवसेना (Shiv Sena) आक्रमक झाली आहे. आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik),संदेश पारकर (Sandesh Parker) यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. कणकवलीत तणावाचे वातावरण असून, पोलिस बंदोबस्त कमालीचा वाढविण्यात आला आहे.

नितेश राणे यांच्या अटकेसाठी पोलीस काल रात्रीपासून जंगजंग पछाडत आहेत. दरम्यान राज्याचे अप्पर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, डीएसपी दाभाडे आज सकाळी कणकवलीत दाखल झाले आहेत. या घटनेची इत्यंभूत माहिती घेतल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी सध्या जिल्हा मुख्यालयात बसून तेथे बैठक सुरू असल्याचे समजते.

शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबरला जीवघेणा हल्ला झाला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या चार तासानंतर संशयित चार आरोपींना अटकही केली होती. सध्या या गुन्ह्यांमध्ये सहा संशयित आरोपीना पोलिसांनी अटक केली आहे.मात्र, या हल्ल्यामध्ये आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांच्यावर थेट आरोप जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी केला होता. त्यामुळे या दोघांची चौकशी झाली होती.

दोन दिवसांपूर्वी दिल्ली (Delhi) येथून सचिन सातपुते (Sachin Satpute) या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर या प्रकरणाला कमालीचे वळण लागले. राणे यांच्या अटकेची शक्यता असल्याने त्यांचाही सध्या ठावठिकाणा लागत नाही. भाजपच्या माध्यमातून याबाबत कोणीही बोलत नाहीत. सकाळपासून शिवसेनेचे कार्यकर्ते कणकवलीत दाखल होत होते. त्यानंतर सकाळी अकराच्या सुमारास वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत पोलीस स्टेशन गाठून, पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांना निवेदनही दिले आहे. नितेश राणे यांना तातडीने अटक करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मेट्रो ९ उद्घाटनाआधीच श्रेयवादाचा वाद; 6 एप्रिलला सोहळा

Kashi-Ujjain Tourism: काशी ते उज्जैन थेट कनेक्शन!! महाकाल-विश्वनाथ मंदिर ट्रस्टमध्ये ऐतिहासिक करार; धार्मिक पर्यटनाला बुस्ट

Hanuman Jayanti 2026: हनुमान जयंतीला सुंदरकांड पठण का मानलं जातं सर्वात प्रभावी? मानसिक शक्ती, आरोग्य अन् यशाचे गुपित फायदे काय?

History Of Rajapur : राजापूर पालिकेची १५० वर्षे; १८७६ मध्ये विकासाची नांदी, बंदर-घाटमाथा संपर्काचे केंद्र

Pune Nashik Highway Accident: पुणे-नाशिक मार्गावर कंटेनर-ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, एकलहरे येथे वाहतूक कोंडी!

SCROLL FOR NEXT