Politics 
महाराष्ट्र बातम्या

'स्वार्थासाठी दिशा सलीयन प्रकरणात महापौर ताईंनी पुढाकार घेतल्याबद्दल आभार'

महापौर ताई राजकारण थांबवा - नितेश राणे

सकाळ डिजिटल टीम

महापौर ताई राजकारण थांबवा - नितेश राणे

मागील काही दिवसांपासून राज्यात अनेक कारणांनी राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोपप्रत्यारोप पहायला मिळाले आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना (Shivsena) यांच्यात अनेक कारणांवरून वाद उफाळलेला दिसत आहे. सध्या दिशा सलियन या प्रकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी काही वक्तव्य केली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता विरोधकांनी निशाणा साधला आहे. भाजपाचे नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत महापौर ताई राजकारण थांबवा, असे म्हणत टोला लगावला आहे.

ट्वीटमध्ये नितेश राणे म्हणातात, पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी (Sanjay Raut) महापौर किशोरी पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की यापुढे दिशा सलीयन प्रकरणावर बोलू नका. पण त्यावर त्या थांबल्या नाहीत. त्यांनी काल महिला आयोगाला पत्र लिहिलं आणि सलीयन कुटुंबियांनाही त्या भेटल्या आहेत. याच महापौरांनी काही महिन्यांपूर्वी आदित्य ठाकरे युवराजांना पेंग्विन म्हणतात, याची घोषणा करून टाकली होती. ४५ वर्षाखालील नेत्यांना उमेदवारी नाही, या आदित्य ठाकरे यांनी केलेल्या छुप्या घोषणेसाठी त्यांचा उत्साह नाही ना? असा सवाल त्यांनी केला आहे.

पुढे त्या म्हणाल्या, दिशा सलीयन (Disha salian) प्रकरणात राजकारण शिवसेनेच्या अंतर्गत सत्ता संघर्षात आहे. रमेश किणी प्रकरणात राज ठाकरे यांनी शिवसेनेमधील घोडदौड थांबवण्यासाठी त्या प्रकरणातल्या बातम्या बाहेर काढण्यात आल्या होत्या. तसेच आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेला थांबवण्यासाठी होत असताना दिसत आहे. स्वार्थसाठी का होईना दिशा सलीयनला न्याय मिळवून देण्यासाठी महापौर ताईंनी पुढाकार घेतला त्यासाठी त्यांचे आभार, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला आहे.

दरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सलीयान यांच्या कुटुंबियांची भेट घेतली होती. या भेटीमुळे कालापासून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT