nitesh rane latest political News
nitesh rane latest political News 
महाराष्ट्र

'अब तक छप्पन, CM ठाकरे....', भाषण सुरु होताच नितेश राणेंचा टोला

सकाळ डिजिटल टीम

मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे

शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन साजरा होत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हॉटेल वेस्टइन इथं शिवसेनेचे आमदार वास्तव्यास असल्यानं हा सोहळा शिवसेनेनं इथं घेतला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर निशाणा साधला. केंद्रातील अग्निपथ योजनेवरही त्यांनी टीका केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु असतानाच भाजपा आमदार नितेश राणे यांनी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. (nitesh rane latest political News)

या कार्यक्रमात बोलत असताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रावर हल्लाबोल केला आहे. अब तक 56 पुढेही सुरूच राहणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. विरोधकांना घमेंड आली आहे. हिंदुत्वाचा नारा शिवसेनेने आणि बाळासाहेबांनी बुलंद केला असल्याचेही ते म्हणाले आहेत. यावर आमदार राणे यांनी ट्विट करत प्रतित्त्युर दिले आहे. अब तक छप्पन, CM ठाकरे बोल बच्चन, असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर भाजप शिवसेना वाद वाढण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?

माझा पक्ष पित्याने स्थापन केल्यामुळे पितृपक्षच आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस आदराने उभा राहतो. तो मान मला बाळासाहेबांनी दिला आहे. विधानपरिषदेसाठी एकही मत फुटलेलं नाही. कारण शिवसेनेमध्ये असं गद्दार कुणी राहिलं नाही. शिवसेना या फाटाफुटीच्या राजकारणात उभी राहिली आहे. ह्रदयात राम आणि हाताला काम असं चित्र सध्या दिसत आहे. हाताला काम नसेल तर नुसतं राम राम म्हणून काही होणार नाही. शिवसेनेने दिलेले वचन पाळले म्हणून आजही शिवसेना टिकून आहे. अग्निपथ मुद्द्यावरून तरूणांची माथी कुणी भडकावली, असा सवालही त्यांनी केला आहे.

काय म्हणाले खासदार राऊत ?

'तेरा घमंड चार दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है' असं वक्कव्य करत शिवसेना खासदार राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस कटकारस्थान करून राज्य चालवता येत नाही, असंही ते म्हणाले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे हिंदुत्वाचे बाप होते. आजचा दिवस पवित्र आहे. शिवसेनेची स्थापना ही एका अग्नीतून झाली आहे. त्यामुळे हिंदुत्वावर शिवसेनेला कुणाचेही मार्गदर्शन नको आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना नावाची ठिणगी पेटवली मुंबईतील या ठिणगीचा देशभर वनवा झाला. त्यामुळे हिंदुत्वाचे धडे सेनेला शिकवण्याची गरज नाही. अब तक 56 पुढेही सुरूच राहणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार X Factor? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT