nitesh rane esakal
महाराष्ट्र बातम्या

मालकाच्या घरीच 'गांजाचा बादशाह'; नितेश राणेंची खोचक टिका

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : ''ज्या पद्धतीने केंद्र सरकार विरोधी पक्षांची सरकारे असणाऱ्या राज्यांमध्ये वागत आहे त्यावरुन त्यांच्या डोक्यात कमी प्रतीचा गांजा असल्याचं दिसून येत आहे, अशी टीका शिवसेनेकडून (shivsena) करण्यात आली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण आणि त्यानंतर भाजपा नेत्यांकडून (bjp) आलेल्या प्रतिक्रियांचा समाचार 'सामना' च्या अग्रलेखातून आज शिवसेनेनं घेतलाय. आता यावरच भाजप नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी संजय राऊतांवर (sanjay raut) निशाणा साधला आहे. काय म्हणाले नितेश राणे....

‘मालकाच्या घरीच ‘गांजाचा बादशाह’असल्यामुळे राऊतांना कमी आणि जास्त प्रतीचा गांजा कसा असतो हे चांगले कळते. गांज्यावर इतके प्रेम बर नाही. अशी खोचक टीका नितेश राणे यांनी ट्वीट करत केली आहे.

सामनातून शिवसेनेची टिका

भाजप व त्यांचे केंद्रातले सरकार कोणत्याही प्रश्नांना सामोरे जात नाहीत. प्रश्न विचारणाऱ्यांना ते खतम करतात. लोकशाही, घटना, कायदा त्यांना मान्य नाही. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे विरोधकांना चिलमीत जास्तीचा गांजा भरुन ‘दम मारो दम’ करावे लागले. त्यांच्या चिलमीतला गांजा कमी प्रतीचा होता हे त्यांच्या बेताल बडबडण्यावरुन स्पष्ट होते.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेच कसे? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर आज शिवसेनेकडून सामनातील अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. एखाद्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू असं म्हणणारे स्वत:च मुख्यमंत्री बनले या विरोधकांच्या टीकेला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: ''मी 'आरएसएस'चेही रक्षण करणार'', राहुल गांधींचं मोठं विधान, संघाबद्दल नेमकं काय म्हणाले?

WTC Final Qualification Scenario: भारताला फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर उरलेले सामने महत्त्वाचे; जाणून घ्या टीम इंडियाचं गणित

मला तिचे बॉयफ्रेंड आवडत नाहीत... लेकीच्या रिलेशनशिपवर संजय जाधव यांचं स्पष्ट मत; म्हणाले, 'तुम्ही घरी या, बोला, पण...'

NHAI New Rules: रुग्णवाहिका उशिरा आली तर दंड होणार! NHAI चा मोठा निर्णय; सर्व प्रकल्पांत ‘केअर सिस्टम’ बंधनकारक, नवे नियम काय?

BMC Recruitment: मुंबई महापालिकेत ६१२ जागांवर भरती; ITI पास तरुणांना मोठी संधी! पाहा कोणती पदे आणि अर्ज प्रक्रिया काय?

SCROLL FOR NEXT