Nitesh Rane - Sindhudurg sessions court rejected bail Sakal
महाराष्ट्र बातम्या

नितेश राणेंना दिलासा नाहीच; सेशन कोर्टानं नाकारला अटकपूर्व जामीन

शिवसेना नेते संतोष परब यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी सुरु होती सुनावणी

Amit Ujagare (अमित उजागरे)

शिवसेना नेते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज (गुरुवार) सिंधुदुर्ग सत्र न्यायालयानं (Sindhudurg Sessions Court) फेटाळला. यामुळं त्यांची अटक आता निश्चित मानली जात आहे, परंतू नितेश राणे हे अज्ञातवासात असून अद्याप पोलिसांच्या हाती आलेले नाहीत. दरम्यान, नितेश राणे यांचे वकील आता हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहेत. गेल्या दोन दिवसापासून सेशन्स कोर्टात ही सुनावणी सुरु होती.(Sindhudurg Sessions Court Rejected Bail for Nitesh Rane)

या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी नितेश राणे यांचे मोबाईल फोन जप्त करायचे असल्यानं त्यांना कस्टडीची गरज आहे. त्यामुळं त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आल्याचं कोर्टानं म्हटल्याचं नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. देसाई म्हणाले, "हायकोर्टात जाण्याचा पर्याय आमच्याकडे आहे. यासंदर्भात चर्चा करुन आम्ही योग्य तो निर्णय घेऊ. हायकोर्टाची प्रक्रिया ही थोडी वेळखाऊ असल्यानं आम्ही उद्या जरी हायकोर्टात गेलो तरी पुढे शनिवार-रविवार दोन दिवस सुट्ट्या असल्यानं आमची फाईल बोर्डवर येण्यास सोमवार किंवा मंगळवार उजाडेल, अर्थात या दिवशीच यावर सुनावणी होऊ शकेल"

नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का?

सत्र न्यायालयात फेटाळल्यानंतर हायकोर्टात जर अटकपूर्व जामीन अर्ज प्रलंबित असेल किंवा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असेल तर पोलिसांपासून दूर राहण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार संबंधित व्यक्तीला असतो. त्यामुळं तो ऑप्शन आमच्याकडे कायदेशीररित्या आहे. त्यामुळं नितेश राणे यांनी पोलिसांसमोर हजर होण्याची गरज नाही. पण जर आम्हाला वाटलं हायकोर्टात जायचं नाही आणि सरेंडर व्हायचं तर तो पर्याय आमच्याकडे उपलब्ध आहे, अशी माहिती अॅड. संग्राम देसाई यांनी सांगितलं.

नितेश राणे यांनी यापूर्वी तपासात सहकार्य केलेलं आहे. यापूर्वी २५ डिसेंबर रोजी नितेश राणे स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन आपला जबाबही नोंदवला आहे. त्यामुळं यापुढेही जेव्हा कोर्ट आम्हाला काही निर्देष देईल किंवा पोलीस तपासासाठी मदत मागतील तेव्हा आम्ही त्यांना मदत करु, असंही नितेश राणे यांचे वकील देसाई यांनी स्पष्ट केलं.

काय आहे प्रकरण?

१८ डिसेंबर २०२१ रोजी कणकवली शहरातील नरडवे तिठा येथे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख असलेल्या संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. या हल्ल्यातील संशयित आरोपी अटक केल्यानंतर तपासाची सुई आमदार नितेश राणे यांच्याकडे गेली होती. त्यामुळं कणकवली पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी आपल्याला अटक होऊ नये यासाठी नितेश राणे आणि संदेश सावंत यांच्यावतीनं जिल्हा न्यायालयात २७ डिसेंबर रोजी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. या अर्जावर २८ व २९ रोजी सुनावणी झाल त्यानंतर कोर्टानं निकाल राखून ठेवण्यात आला होता. गुरुवारी सायंकाळी ६ वाजता याबाबतचा निकाल न्या. एस. व्ही. हांडे यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Shetty : रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, आणखी चौघांना अटक; मोबाईलसह महत्त्वाचे पुरावे हाती

IND vs PAK सामन्यानंतर वातावरण तापलं; सूर्या अन् हार्दिक कुलदीप यादववर भडकले, नेमकं काय घडले; पाहा Viral Video

5G च्या नावाखाली तुमची फसवणूक तर होत नाहीये ना? घरबसल्या 'इथून' चेक करा तुमच्या एरियातलं नेटवर्क

Latest Marathi News Update : नाशिकच्या दरी मातोरी परिसरात बिबट्याचा मुक्त संचार

Central Railway: शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी आनंदवार्ता! विशेष रेल्वे गाड्यांना मुदतवाढ, आरक्षण सुरू; पाहा वेळापत्रक

SCROLL FOR NEXT