महाराष्ट्र बातम्या

'चावायचं असेल तेंव्हा...' नितेश राणेंच नवं ट्विट; निशाण्यावर संजय राऊत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: आज खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनाभवनात ही पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत ते मोठे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली होती. भाजपच्या (BJP) साडेतीन नेत्यांना आम्ही तुरूंगात टाकू असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. त्यामुळे हे नेते कोण याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

यावर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी ट्विट करत टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, चाटायचं असेल तेव्हा .. पवार साहेब!! चावायचं असेल तेव्हा.. बाळासाहेब !! याला म्हणतात.. लोंबत्या राऊत!!

दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता टीका करणारं ट्विट केलंय. त्यांनी म्हटलंय की, आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है !

आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या अनेक नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत यांनी म्हटलंय की, केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर सुरु आहे. खोटे आरोप, बदनाम्या, त्यांचा दबाव, एकतर तुम्ही गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू, अशा प्रकारच्या धमक्या सतत दिल्या जात आहेत. ज्या महाराष्ट्रामध्ये 170 चं बहुमत असताना भाजपचे लोक सरकार पडण्याची एक तारीख देतात, ती कशाच्या आधारावर देतात? यासंदर्भात मी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून केंद्रीय तपास यंत्रणा कशाप्रकारे त्रास देत आहेत, याबाबत तक्रार केली आहे.

पुढे त्यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर आता प्रवीण दरेकर यांनी टीका करत म्हटलंय की, पिक्चरला हा ट्रेलरच फुस्स आहे. फ्लॉप गेला आहे. वाईट वाटलं की ज्या पद्धतीने आमदार यायला हवे होते. त्या शिवसेनेच्या आमदार-खासदारांनी पाठ फिरवली आहे. नाशिकवरुन गाड्या करुन लोक आले पण तोंडावर आपटले आहेत.

पुढे ते म्हणाले की, सत्तेतला पक्ष विरोधी पक्षनेत्यावर मोर्चा काढतो. सत्तेतला पक्ष अटकेची मागणी करतो. मागणी सत्तेतल्या पक्षाने करायची नसते, विरोधी पक्षाने करायची असते. पण सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पक्षनेत्यांच्या घरावर आंदोलन केलं जातं. यांना फक्त इव्हेंट करायचा आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे. तुमच्या लग्नापर्यंत पोहोचलात म्हणून तुम्ही सुधीर मुनगंटीवार यांच्या घरच्या लग्नापर्यंत पोहोचलात.

पुढे ते म्हणाले की, मला वाटतं किरीट सोमय्यांना जेलमध्ये टाका, तक्रार करा, उलट सोमय्यांनी घोटाळा बाहेर काढला. सरकार तुमचं आहे तक्रार करा, चौकशी करा, कारवाई करा, असं त्यांनी म्हटलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

SCROLL FOR NEXT