Nitesh Rane
Nitesh Rane esakal
महाराष्ट्र

"महाविकास आघाडीला आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी"

सकाळ डिजिटल टीम

राज्याच्या राजकारणात आता नव्या समिकरणांची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jalil) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला युतीची ऑफर दिली आहे. स्वत: खासदार जलील यांनीच ही माहिती प्रसारमाध्यमांना दिली. एमआयएमच्या या ऑफरनंतर आता यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असून महाविकास आघाडीच्या भूमिकेकडं सर्वांचे लक्ष लागून आहे. यावर भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी ट्वीट करत महाविकास आघाडीवर टीका केली. (Nitesh Rane tweet on AIMIM offer to state government for alliance)

नितेश राणे ट्वीटद्वारे म्हणाले, “वाह.. AIMIM ची महाविकास आघाडी मध्ये येण्याची तयारी.. कट्टरपंथीना पण शिवसेना आपलीशी वाटायला लागली आहे.. आता फक्त ISIS चा प्रस्ताव येणे बाकी आहे.. खरंच, करून दाखवलं!!”

ओवैसींच्या एमआयएमनं महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची तयारी दाखवलीय. महाविकास आघाडीशी हातमिळवणी करण्याची एमआयएमची तयारी असल्याचं समोर आलंय. शरद पवारांपर्यंत निरोप पोहोचवा, अशी विनंती एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपेंना केलीय. राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एमआयएमकडून आघाडीची ऑफर देण्यात आलीय. भाजपला हरवायचं असल्यास सर्वांनी एकत्र यायला हवं, असं खासदार इम्तियाज जलील यांनी वक्तव्य केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS Live Score : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

काँग्रेसमध्ये धुसफूस! मल्लिकार्जुन खरगेंच्या फोटोला काळे फासले, अधीर रंजन चौधरींबाबत केलेल्या वक्तव्यामुळे कार्यकर्ते नाराज

जम्मू काश्मीरमध्ये लोकसभेच्या मतदानापूर्वी दहशतवाद्यांचा हल्ला! भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, तर एक दाम्पत्य जखमी

SCROLL FOR NEXT