Nitesh Rane sakal
महाराष्ट्र बातम्या

"...आता यांची वेळ"; राऊतांच्या अटकेनंतर नितेश राणेंचं ट्वीट

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा ईडीने अटक केली

दत्ता लवांडे

मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना काल रात्री उशीरा ईडीने अटक केल्यावर अनेकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. त्यानंतर भाजप नेत्यांनीही ईडी कशी बरोबर आहे हे जीव तोडून सांगितलं आहे. त्यानंतर आता भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट करून पुन्हा शिवसेनेला डिवचलं आहे.

(Nitesh Rane Twit)

"आता वेळ आली..." (It's Time) असं लिहित नितेश राणे यांनी शिवसेनेचे नेते अनिल परब यांचा फोटो ट्वीट केला आहे. त्यामुळे ईडीची पुढील धाड अनिल परबांवर असेल का? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, नितेश राणे यांच्या ट्वीटनंतर भाजपच्या नेत्यांना ईडीची पुढची धाड कुणावर पडणार हे कसं काय माहिती आहे? अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.

संजय राऊत यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली आहे. त्यानंतर भाजप सूडाचं राजकारण करत केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यानंतर मला राऊतांचा अभिमान आहे, ते माझे जुने मित्र आहेत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, शिवसेनेचे नेते अनिल परब यांच्या घरीही ईडीने धाड टाकली होती. काही दिवसांपूर्वी परबांच्या संबंधित दहा ठिकाणी धाडी टाकल्या होत्या. त्यामुळे तेही ईडीच्या रडारवर असल्याचं पहायला मिळालं होतं. पण आता राऊतानंतर अनिल परब यांचा नंबर अशा नितेश राणेंच्या ट्वीटनंतर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत विसर्जन मिरवणुकीत भरधाव कार घुसली, गणपतीच्या ट्रॉलीला धडक देत 4 जणांना उडवलं; घटनास्थळाचा VIDEO

सौंदर्य अन् बुद्धिमत्तेचा संगम! वयाच्या २३व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक करून बनली IFS अधिकारी, कोण आहे तमाली साहा?

Asian Games 2026 : अडखळला, पडला... पण जिद्दीने शर्यत पूर्ण करून भारताचा ४४ वर्षांचा दुष्काळ संपवला! कोण आहे सावन बरवाल?

Satara DJ Dolby Action : पोलिसांची कारवाई चुकीचीच! साताऱ्यात डीजे जप्त झाल्यानंतर उदयनराजेंनी थेट घेतली डॉल्बी चालकांची बाजू; पालकमंत्री देसाईंची भूमिका काय?

Latest Marathi News Live Update : कोल्हापुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत सतेज पाटलांनी डीजेच्या तालावर धरला ठेका; व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT