Manoj Jarange esakal
महाराष्ट्र बातम्या

Manoj Jarange : ''फडणवीसांवर बोलाल तर गाठ मराठ्यांशी आहे'', नितेश राणेंचा जरांगेंना इशारा

संतोष कानडे

मुंबईः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणात खोड्या करत आहेत, अशी टीका करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना भाजप आमदार नितेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत. त्यामुळे तेच याच्यात खोड्या करत असल्याचा आरोप जरांगे यांचा आहे. त्यांना उत्तर देताना नितेश राणे म्हणाले की, तुम्ही मराठा आरक्षणाबद्दल बोलत राहा, त्याचं आम्ही स्वागतच करु. परंतु ज्या फडणवीसांनी मराठ्यांना टिकणारं आरक्षण दिलं, योजना जाहीर केल्या, त्यांच्या विरोधात भूमिका घ्याल तर गाठ मराठ्यांशी आहे.

भुजबळांना गोळ्या सुरु करण्याची गरज- जरांगे

निलंगा येथे पत्रकारांशी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायची गरज नाही. ते कामातून गेले आहेत. त्यांनी आता लवकर गोळ्या सुरू करून घेतल्या म्हणजे बरं होईल.

फडणवीसांवर टीका

प्रवीण दरेकर यांच्या टीकेला उत्तर देताना जरांगे म्हणाले की, राज्यात शांतता राहावी म्हणून फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली ती चूक झाली असं म्हणायचं का त्यांना? आरे व्वा मग चांगला मराठ्याचा नेता आहे.

सध्या तो लोंढा का खोंढा वळवळ करतोय हे सगळेच फडणवीसांच्या ताटात जेवणारे आहेत. देवेंद्र फडणवीस साहेब मराठ्यांच्या अंगावर किती मराठे घालणार आहेत? 'बघुया.. आहोत शांत तर शांत राहू द्या.. कशाला वातावरण ढवळीता अशी टिकाही त्यांनी यावेळी केली.

जरांगे पुढे म्हणाले की, तुमच्या डोक्यात काही विषारी विचार असतील तर मराठ्यांच्या डोक्यात नका उतरवू, तुमच्या ताटात जेवणारी माणसं असे वक्तव्य करीत असातील तर चांगली गोष्ट नाही. बरळा तुम्हाला काय बरळायचे ते, पुढं सामना मैदान सोबतच आहे बघू. समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करू नका तुमच्यावर आता विश्वासच राहिला नाही, अशा भावना त्यांनी यावेळी बोलून दाखवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : मुसळधार पावसाचा कहर, सायन-पनवेल हायवे जलमय

SCROLL FOR NEXT