हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे चालवण्यासाठी बंड करुन भाजपसोबत युती केल्याचे शिंदे गटाच्या आमदारांनी पहिल्यापासूनच सांगितले आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हेच हिंदुहृदयसम्राट अशीच सर्वांची भावना असतानाच आता नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट म्हणून केला आहे. त्यावरुन नितेश राणे यांच्यावर टीका केल्या जात आहेत.
नांदेड येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात नितेश राणे यांच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हिंदुहृदयसम्राट या वक्तव्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबन थोरात यांनी तर नितेश राणे म्हणजे ‘चायना आयटम’ असल्याचे सांगितले आहे. वेगवेगळ्या कारणास्तव शिवसेना भाजप यांच्यातील मतभेद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
शिवसेनेला हिंदूत्वाचा विसर पडल्याचा आरोपही भाजपाकडून सातत्याने केला जात आहे. याशिवाय खरे हिंदूत्व हे भाजपकडून जोपासले जात असल्याचे वारंवार दाखवून देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपाच्या एका कार्यक्रमात नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच उल्लेख हिंदुहृदयसम्राट म्हणून केला आहे. गेल्या काही दिवसातील देवेंद्र फडणवीस यांचे कार्य पाहिले तर तेच खरे हिंदुहृदयसम्राट आहेत असंही राणे म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.