Eknath Shinde Sakal
महाराष्ट्र बातम्या

केंद्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान; रोहित पवारांची टीका

दत्ता लवांडे

मुंबई : आज निती आयोगाची बैठक दिल्लीत पार पडली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधानांकडे १८ हजार कोटींच्या विकास कामाचे प्रस्ताव पाठवले आहेत. या बैठकी दरम्यान मुख्यमंत्री सर्वांत शेवटच्या रांगेत उभे असल्याचं फोटोत दिसत आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत उभं केल्यामुळे रोष व्यक्त केला आहे. त्याचबरोबर अनेकांनी यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

"एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!" असं ट्वीट रोहित पवारांनी केलं आहे.

दरम्यान आज दिल्लीत निती आयोगाची बैठक पार पडली असून यावेळी राज्याच्या विकासाच्या आराखड्यावर चर्चा केली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. त्यामध्ये काढलेल्या एका फोटोत मुख्यमंत्री शेवटच्या रांगेत उभे असल्याचं दिसत आहे. त्यावरून सध्या वातावरण पेटलं असून अनेक नेत्यांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं शेवटच्या रांगेत स्थान देणं चुकीचं आहे. त्यामुळे मराठी मनाला दु:ख झालं असून यापुढे केंद्र सरकार दक्षता घेईल अशी अपेक्षा करूयात असं रोहित पवार म्हणाले आहेत. तर केंद्रात मुख्यमंत्र्यांना दिलेल्या वागणुकीवर अनेकांकडून केंद्र सरकारवर नाराजी व्यक्त केली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT