Nitin Gadkari Esakal
महाराष्ट्र बातम्या

Nitin Gadkari : "शरद पवार म्हणजे जपानी बाहुली"; गडकरींची शरद पवारांवर खोचक टीका

नागपुरातील एका कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

Sharad Pawar News : 'शरद पवार हे म्हणजे जपानी गुडिया प्रत्येकाला वाटतं की, ती आपल्याकडे बघूनच डोळा मारत आहे', असं म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरमध्ये भाजपच्या नागपूर ग्रामीण युनिटमधील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते. या कार्यक्रमामध्ये त्यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे. या कार्यक्रमावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते.

'जपानी गुडिया जशी प्रत्येकाकडे बघून डोळा मारते तसचं काहीसं शरद पवार यांचं आहे. कार्यकर्त्याला असचं वाटतं साहेब आपल्याकडे बघून बोलत आहेत, कामाला लागा. पण त्यानंतर तिकीट मात्र भलत्यालाच मिळतं', अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी बोलताना नितीन गडकरींनी कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना मोलाचा सल्ला दिला आहे. गडकरी म्हणाले की, 'थिंक फॉर द बेस्ट अॅन्ड प्रीपेअर फॉर द वर्स्टट, 'आपण नेहमी आपलं काम व्यवस्थित करावं. मिळालं तर बोनस नाही मिळालं तर दु:ख नाही', पण नेत्यांना चॉकलेट वाटण्याशिवाय पर्याय नसतो अशी मिश्लिक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

नितीन गडकरींनी पहिलयांदाच शरद पवारांवर केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. गडकरींच्या या टिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT