नितीन गडकरी 
महाराष्ट्र बातम्या

गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात - चव्हाणांनी केलं कौतुक

नामदेव कुंभार

भाजपचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी कौतुकाची थाप मारली आहे. केंद्रातील भाजप सरकारची कामगिरी उणे आहे. असं असतानाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं कामकाज चांगलं आहे. गडकरी म्हणजे, चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस आहे, असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं आहे. 30 मे रोजी केंद्रातील मोदी सरकारला सात वर्ष पूर्ण झाली. केंद्र सरकारच्या कारभाराचे मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने काँग्रेसनं आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नोटबंदी, जीएसटी याचबरोबर करोना हाताळणीत केलेल्या चुकांमुळे ‘ गंगा मैली’ झाल्याचे सांगत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना अशोक चव्हाण यांनी रस्ते विकास आणि वाहतूक क्षेत्रातील गडकरींच्या कामावर कौतुकांचा वर्षाव केला. ते म्हणाले की, अधिकार काढून घेण्याचे प्रयत्न केंद्र सरकारकडून केले जात असून गडकरी यांची कोंडी केली जात आहे. नितीन गडकरी यांचं काम चांगलं आहे. गडकरी म्हणजे, चुकीच्या पक्षातील चांगला आणि कार्यक्षम माणूस आहे, असं चव्हाण म्हणाले.

अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले. शेकडो मृतदेह गंगेत प्रवाहित होऊ देणाऱ्या मोदी सरकारला पाहून राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील 'राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते' या गाण्याची आठवण होते. मोदी सरकारने या गाण्यातील शब्द प्रत्यक्षात उतरवले आहेत.

काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, इतिहास आहे. देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक महान नेत्यांचा वारसा आहे. पण भाजपकडे यातलं काहीच नाही. ना गौरवशाली इतिहास आहे, ना परंपरा आहे, ना वारसा आहे. या न्युनगंडाने भाजप पछाडली आहे. आम्ही काँग्रेसपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी भाजप काही तरी ऐतिहासिक करण्याचा आव आणते. पण इतिहास घडवण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भविष्याचे नियोजन असावे लागते. भाजपकडे नेमका त्याचाच अभाव आहे. केवळ भाषणे, स्टंट आणि इव्हेंट करून इतिहास घडत नाही, असे चव्हाण म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Scenario: १७ चेंडूंत ८८ धावांचं वादळ... वैभव सूर्यवंशीची विक्रमी खेळी अन् RR ची Point Table मध्ये उलथापालथ

Parth Pawar Clarification : प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी काम करणार? पार्थ पवारांनी दिले स्पष्टीकरण; 'ही केवळ स्नेहभेट'

RR vs LSG Live: वैभव सूर्यवंशीने मोठा विक्रम मोडला; फिफ्टीनंतर 'A' सेलिब्रेशनची रंगलीय चर्चा... नेमका त्याचा अर्थ काय? Video Viral

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; २१ वर्षांत तब्बल २५ बदल्या, आता नवी जबाबदारी

राज्यात फक्त एक महिना पुरेल इतकाच इंधनसाठा...छगन भुजबळ यांच्या विधानानं खळबळ, नेमकं कायम म्हणाले?

SCROLL FOR NEXT