nitin gadkari take caution of ncp worker ashish mete tweet
nitin gadkari take caution of ncp worker ashish mete tweet 
महाराष्ट्र

जेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या तक्रारीची दखल नितीन गडकरी घेतात...

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आपल्या कामामुळे नेहमीच ओळखले जातात. परंतु, सध्या पावसामुळे त्यांचे खाते असलेल्ला रस्त्यांची परिस्थिती ही अत्यंत बिकट झालेली पाहायला मिळत आहे. यासंबधीची राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आशिष मेटे यांनी औरंगाबाद-जळगाव महामार्गाची दुर्दशा दाखविणारा फोटो गडकरींना ट्विट केला होता. त्यावर नितीन गडकरी यांनी स्वतः उत्तर देत खराब रस्त्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी आणि कंत्राटदाराला सोडणार नसल्याचे सांगितले आहे.

गडकरी प्रशासनातील कामचुकार अधिकारी असो वा भ्रष्टाचारी कंत्राटदार चुकीच्या कामांसाठी ते कुणालाही सोडत नाहीत. परंतु त्यांनी थेट विरोधी बाकावरील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला दिलेल्या उत्तरामुळे हा एक चर्चेचा विषय बनला आहे.
 

दरम्यान, औरंगाबाद–जळगाव महामार्गावर पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. या रस्त्यावर एक एसटी बस चिखलात रुतून बसल्याचा फोटो काही दिवसांपासून व्हायरल होत होता. हा फोटो आशिष मेटे यांनी ट्विट करत गेल्या चार वर्षांपासून या अशा रस्त्यावर जनता जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहे, तसेच इथे अनेक अपघात घडल्याचे म्हटले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, अशी मागणी मेटे यांनी केली होती. या मागणीला गडकरी यांनी तात्काळ उत्तर दिले.

गडकरी म्हणाले की, औरंगाबाद-सिल्लोड-जळगाव महामार्गाची दुरवस्था माझ्या निदर्शनास आली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित मुख्य अभियंत्यांना याबाबत माहिती दिली असून आठ दिवसांच्या आत या रस्त्याची दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जर वेळेत काम केले नाही तर अधिकारी आणि कंत्राटदार यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशी तंबी गडकरी यांनी ट्विटद्वारे दिली आहे. गडकरींच्या रिप्लायनंतर आशिष मेटे यांनी गडकरी यांचे आभार मानले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT