Nitin Raut on chhatisgarh dharm sansad  google
महाराष्ट्र बातम्या

गांधीजींविरोधात धार्मिक नेत्याचं आक्षेपार्ह विधान, राऊतांचा मोदींवर हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : छत्तीसगड येथील रायपूर येथे दोन दिवसीय धर्म संसद (Chhatisgarh Dharm Sansad) भरविण्यात आली होती. यामध्ये महाराष्ट्रातील धार्मिक नेता कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल (Mahatma Gandhi) आक्षेपार्ह विधान केलं. त्यानंतर आता काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत (Maharashtra Minister Nitin Raut) यांनी थेट पंतप्रधान मोदींना (PM Modi) सवाल करत कालीचरण यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा -

ज्याठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधींना मंचावरून शिव्या घातल्या जातात, त्याच ठिकाणी बसलेले लोक टाळ्या वाजवतात. नरेंद्र मोदीजी आपण देशाला काय बनवून ठेवलंय? महात्मा गांधींच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे हीच खरी बापूंना श्रद्धांजली असेल असं नितीन राऊत म्हणाले.

धार्मिक नेत्यांची भडकाऊ भाषणं -

रायपूर येथे एनजीओ नीलकंठ सेवा समिती आणि दूधधारी मठ यांनी दोन दिवसीय धर्मपरिषद आयोजित केली होती. या कार्यक्रमात काँग्रेस नेते प्रमोद दुबे आणि भाजप नेते ब्रिजमोहन अग्रवाल आणि विष्णू देव साई उपस्थित होते. तसेच देशभरातील २० पेक्षा अधिक धार्मिक नेत्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी काही नेत्यांनी हिंदू राष्ट्रासाठी हातात शस्त्र घेण्यास सनातनी हिंदूना सांगितले. तसेच इतर धर्माबद्दल भडकाऊ भाषण केली.

कालीचरण यांचं महात्मा गांधींविरोधात वक्तव्य -

अकोला येथील धार्मिक नेता कालीचरण यांनी महात्मा गांधींबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचं आणि अपमानकार विधान केलं. तसेच नथुराम गोडसेला नमस्कार करतो, असं ते म्हणाले. अल्पसंख्याक समाज विविध देशांचे राजकारण आणि प्रशासन नियंत्रित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. त्यांच्या या विधानानंतर संसदेचे संयोजक आणि दूधधारी मठाचे प्रमुख महंत राम सुंदर दास यांनी तीव्र निषेध नोंदविला. त्यानंतर रविवारी रात्री उशिरा कालीचरण विरुद्ध आयपीसी कलम ५०५(२) आणि २९४ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyanagar : एबी फॉर्म मिळवून अर्ज भरला, पक्षानं काढून टाकलं, चोरीचा ठपका ठेवत शिस्तभंगाची कारवाई

Stock Market Today : आज भारतीय शेअर बाजार विक्रमी पातळीच्या जवळ बंद; सेन्सेक्स तब्बल 446 अंकांनी वाढला; हे शेअर्स फायद्यात!

Pune Municipal Election : पुण्यात ३५ लाख ५१ हजार मतदार! १० प्रभागातील मतदार संख्या लाखाच्या पुढे, प्रचारात उमेदवारांची होणार दमछाक

Kolhapur News: जिल्ह्यातील ८४ सहकारी दूध संस्थांतील कारभाऱ्यांकडून निवडणुकीसाठी टाळाटाळ

Ashes 2025-26 Details: सुरू होतोय ऍशेस मालिकेचा रोमांचक थरार! भारतात कुठे आणि कसे पाहाणार सामने? जाणून घ्या सविस्तर

SCROLL FOR NEXT